शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi च्या घरातील ‘डोकं नसलेले’ व ‘फक्त भटकणारे’ हे चार स्पर्धक झाले नॉमिनेट, या आठडव्यात कुणाचा पत्ता कट होणार?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 29, 2024 | 11:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Varsha Usgaonkar Konkan Hearted Girl aka Ankita Walawalkar Abhijeet Sawant and Nikki Tamboli are nominated see the details

Bigg Boss Marathi 5 च्या घरातील चार स्पर्धक झाले नॉमिनेट, नक्की कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला चांगलीच रंगत येत असून या शोला आता जवळपास एक महिना पूर्ण झाला आहे. दिवसेंदिवस या घरातील स्पर्धकांचे रंग आता समोर येत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच दिवसापासून प्रेमाची वारे वाहू लागले होते. मात्र, आता जस-जसे दिवस पुढे जात आहेत, तसे सर्व सदस्यांचे खरे चेहरे समोर यायला लागले आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या पाचव्या आठवड्याच्या सुरुवातीलाच नॉमिनेशन टास्क सुरू झाला आहे. या नॉमिनेशनसाठी मानकापाचा टास्क ठेवण्यात आला होता. मानकाप्यापासून वाचण्यासाठी स्पर्धकांना संपूर्ण आठवडाभर ‘बिग बॉस’ यांनी नेमून दिलेल्या जोडीनेच फिरायचं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

‘बिग बॉस’ यांनी निक्की-अभिजित, अरबाज-आर्या, जान्हवी-सूरज, वैभव-धनजंय, अंकिता-वर्षा, पंढरीनाथ-घनःश्याम अशा जोड्या तयार करण्यात आल्या. यात घरातील स्पर्धकांनी जोडीला नॉमिनेट करायचे होते. यावेळी घरातील सर्व स्पर्धकांनी त्यांचे या घरात राहण्याचे योग्य कारण देत इतर स्पर्धकांना नॉमिनेट केले आहे आणि  या नॉमिनेशन टास्कमध्ये घरातील एकूण चार स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. अंकिता वालावलकर, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत व या घरचीआताची कॅप्टन निक्की तांबोळी हे चार स्पर्धक घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात नात्यांची समीकरणे बदलणार, कोणाला मिळणार प्रेमात ठोकर आणि कोणाला होणार पश्चात्ताप?

यावेळी डीपीने अभिजीत व निक्की यांना सुरक्षित करत पॅडी व घन:श्याम यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर वर्षाताईंनी पॅडी व घन:श्याम यांना सुरक्षित करत वैभव व डीपी यांना नॉमिनेट केलं. त्यानंतर सूरजने या दोघांना सुरक्षित करत आर्या व अरबाज यांना नॉमिनेट केलं. पॅडी कांबळे यांनी आर्या व अरबाज यांना सुरक्षित करत वैभव व डीपी यांना नॉमिनेट केलं. यानंतर आर्याने या घरात राहण्यासाठी डीपी व वैभव यांच्याऐवजी घन:श्यामव पॅडी यांना नॉमिनेट करते. पुढे अरबाज वैभव डीपी यांना सुरक्षित करत अंकिता व वर्षा यांना नॉमिनेट करतो. मग पुढे वैभव येऊन पॅडी व घन:श्याम यांना सुरक्षित करत निक्की व अभिजीत यांना नॉमिनेट करतो.

आणखी वाचा – Suhasini Deshpande Death : मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन

यामुळे नॉमिनेशनसाठी निक्की-अभिजीत व अंकिता-वर्षा या दोन जोड्या नॉमिनेट होतो. पुढे या टास्कसाठी अभिजीत येतो व तो अंकिता व वर्षा यांच्याऐवजी वैभव व डीपी यांना नॉमिनेट करतो. त्यानंतर घन:श्याम येतो व सर्व सूत्र हलतात. घन:श्याम या टास्कमध्ये वैभव व डीपी यांचा खेळ चांगला असल्याचे म्हणत त्यांना  सुरक्षित करतो आणि त्यांच्याऐवजी पुन्हा वर्षा व अंकिता यांना नॉमिनेट करतो. त्यामुळे आता या आठवड्यात नक्की कोण घराबाहेर जाणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.          

Tags: abhijeet sawantankita walawalkarnikki tambolivarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Paaru Serial  Update todays episode update

Paaru Marathi Serial : प्रीतम-प्रियाचं प्रेम आदित्यला अमान्य, पारू समजूत काढू शकेल का?, पाहणं ठरणार रंजक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.