Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता उलटे फासे पडताना पाहायला मिळत आहेत. स्पर्धकांमधील प्रेम संपलेलं असून वाद-विवाद, भांडण, हाणामारी होताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात दोन टीम पडलेल्या दिसत आहेत. टीम ए मध्ये अरबाज पटेल, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर, घनःश्याम दरवडे ही कलाकार मंडळी धुमाकूळ घालताना दिसत आहेत. दरम्यान टीम ए मधून निक्कीने एक्झिट घेतली असल्याचं पाहायला मिळालं. भाऊच्या धक्क्यावर रितेशने निक्कीसमोर तिच्या टीममधील स्पर्धकांची पोलखोल केली. त्यामुळे निक्कीला खूप मोठा धक्का बसला.
दरम्यान समोर आलेल्या प्रोमोमध्ये इतर स्पर्धक निक्कीबाबत चर्चाही करताना दिसले. भाऊच्या धक्क्यावेळी रितेशने अभिजीत व निक्की आणि अरबाज व आर्या या दोघांना एकत्र राहायचा टास्क दिला. सुरुवातीपासून निक्कीने अभिजीतबरोबर केलेली मैत्री अरबाजला खटकलेली दिसली. यावरुन त्यांच्यात अनेकदा वादही झाले. हे वाद काही काळापुरते राहिले. मात्र निक्कीसमोर अरबाजचा खरा चेहरा येताच निक्कीने अरबाजबरोबरचे आणि टीम ए मधील सर्व स्पर्धकांबरोबरचे संबंध कायमचे तोडून टाकले.
अशातच ‘बिग बॉस’ यांनी दिलेल्या नव्या टास्कचा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज व निक्की एकत्र बसून बोलत असतात तेव्हा ‘बिग बॉस’ आवाज देत म्हणतात, अभिजीत तुम्ही जोडीत बांधले गेले आहात. या परिस्थीवर कोणतं गाणं तुम्हाला सुचतंय?”, यावर अभिजीत म्हणतो, “हम दोनो दो…”. यावर सर्वत्र हशा पिकतो. तेव्हा अंकिता वालावलकर म्हणते, “आज आम्हाला कळलं जोड्या ‘बिग बॉस’च्या घरात बांधलेल्या असतात”. यानंतर अभिजीत व निक्की पुढे येत, “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहेना” हे गाणं गाताना दिसत आहेत.
अभिजीत व निक्कीला एकत्र वेळ घालवताना, गाताना पाहून टीम ए मधील स्पर्धकांचा चेहरा उतरला. मात्र इकडे टिमबरोबर नसल्याने निक्कीच्या चेहऱ्यावर कोणतंच टेन्शन दिसलं नाही. आता अभिजीत व निक्कीमधील मैत्री कितपत फुलणार?, अरबाज, आर्या मिळून या दोघांना हरवणार का? हे सार टास्क दरम्यान पाहणं रंजक ठरेल.