मल्याळम सिनेसृष्टी सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे आली आहे. अलीकडेच एका मल्याळम अभिनेत्रीने अभिनेता दिलीपवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. यानंतर न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील महिलांची असुरक्षितता आणि परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला होता. अशातच आता एका बंगाली अभिनेत्रीने मल्याळम दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले आहेत. बंगाली चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीलेखा मित्राने मल्याळम दिग्दर्शक रंजीत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने दावा केला आहे की, रणजीतने तिला एकदा आपल्या बेडरूममध्ये बोलावले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. यानंतर अभिनेत्री माफी मागून खोलीबाहेर आली.
श्रीलेखाने सांगितले की ही घटना २००९मध्ये घडलेली असून आता १५ वर्षांनंतर श्रीलेखाने या घटनेबाबत आपले मौन सोडले आहे. अभिनेत्री (पालेरी माणिक्यम : ओरू पाथिरकोलापथकथिंते)च्या ऑडिशनसाठी गेली असताना तिच्याबरोबर हा प्रकार झाला. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रीलेखाने रंजीत यांच्यावर आरोप केले आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, श्रीलेखा म्हणाली की, “चित्रपट निर्मात्याने मला त्याच्या बेडरूममध्ये बोलावले. बेडरूममध्ये अंधार होता आणि त्यात बाल्कनी होती आणि संभाषणादरम्यान त्याने माझ्या बांगड्यांना हात लावला. त्याने मला काही माहित नसल्यासारखे भासवले. यामुळे मी थोडे अस्वस्थ झाले. पण मी संभाषण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला”.
आणखी वाचा – “राखी सावंतला आणा तरच…”, Bigg Boss Marathi वरुन शशांक केतकरच्या बायकोचं वक्तव्य, म्हणाली, “कृपया…”
श्रीलेखा पुढे म्हणाली की, “मी कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याचे पाहून त्याने माझ्या मानेला हात लावला आणि माझ्या शरीराला स्पर्शही केला. जे मला सहन होत नव्हते. मी माफी मागितली आणि खोलीबाहेर पडली. हे अत्यंत क्लेशकारक होते आणि मी ही घटना तेव्हा कोणाशीही शेअर करू शकली नाही. या घटनेनंतर मी घाबरून हॉटेलमध्येच राहिले. विचार करत होते की, १० जणांनी येऊन माझा दरवाजा ठोठावला तर काय होईल? मी सकाळ होण्याची वाट पाहत राहिली. माझ्यासाठी हे धक्कादायक नव्हते, कारण मला माहित आहे की इंडस्ट्रीत अशा गोष्टी चालतात . इथे चांगले व वाईट लोक आहेत”.
आणखी वाचा – “तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले पण…”, जय दुधाणे वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाला, “अगदी काल-परवाच…”
चित्रपट निर्माते रंजीत यांनीही श्रीलेखाच्या आरोपांना उत्तर दिले. अभिनेत्रीचे आरोप फेटाळताना ते म्हणाले की, “चित्रपट निर्माते शंकर रामकृष्णन आणि इतर उपस्थित होते. कथित घटना घडली नाही. तिची (श्रीलेखा मित्रा) ऑडिशन चांगली नव्हती आणि तिला याबद्दल माहिती देण्यात आली. त्यामुळे हा वाद निर्माण करण्यामागे तिचा एक अजेंडा आहे. त्यावर काही कायदेशीर कारवाई केल्यावर तिला याच पद्धतीने उत्तर दिले जाईल”.