मराठी सिनेसृष्टीतील रोमँटिक जोडीपैकी एक जोडी म्हणजेच अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर. प्रथमेश व क्षितिजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत या जोडीने प्रेमाची जाहीर कबुली दिली. प्रेमाची कबुली दिल्यानंतर तीन वर्षांनी या जोडीने लग्न बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. आणि अखेर २४ फेब्रुवारी २०२४ रोजी ही जोडी लग्नबंधनात अडकली. (prathamesh parab and kshitija ghosalkar)
अगदी थाटामाटात लग्न करत प्रथमेश व क्षितिजा यांचे फोटो देखील बरेच व्हायरल झालेले पाहायला मिळाले. लग्नादरम्यान दोघांनी बरीच धमाल केलेलीही पाहायला मिळाली. आज प्रथमेश व क्षितिजाच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झाले आहेत. सहा महिने पूर्ण होताच प्रथमेश व क्षितिजा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. ही पोस्ट शेअर करत दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. क्षितिजा व प्रथमेश सोशल मीडियावर सक्रिय असतातच आणि ते त्यांच्या चाहत्यांबरोबर नेहमीच काही ना काही शेअर करत असतात.
“सहा महिने कमी झाले आणि तरीही प्रत्येक वेळी जेव्हा मी तुला पाहतो तेव्हा मला फुलपाखरु जवळ असल्याचा भास होतो. आणि असेच नेहमी वाटत राहो”, असं कॅप्शन देत प्रथमेशने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक सुंदर असा दोघांच्या रोमँटिक फोटोशूटचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रथमेश व क्षितिजा एकमेकांच्या जवळ येत पावसाचा आनंद लुटताना दिसत आहेत.
आणखी वाचा – “तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले पण…”, जय दुधाणे वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाला, “अगदी काल-परवाच…”
लग्नानंतर प्रथमेश व क्षितिजा बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. दोघेही कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून एकमेकांना वेळ देताना दिसतात. बरेचदा ते एकत्र फिरतानाही दिसतात. क्षितिजाही नवऱ्याचं कौतुक करत अनेकदा पोस्ट शेअर करताना दिसते. लग्नाला सहा महिने पूर्ण होताच दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेली पोस्ट साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.