Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यंदाच्या या पर्वातील स्पर्धक बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळत आहेत. अशातच अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन ‘बिग बॉस’मध्ये चर्चेत असलेली दिसली. अशातच या आठवड्यात जान्हवीने केलेलं भाष्य अनेकांना खटकलं. ते म्हणजे तिने पॅडी कांबळे यांचा केलेला अपमान. जान्हवीने घरातील सदस्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे यांच्या अभिनय व करिअरबाबत अपमानास्पद वक्तव्य केले.
‘सत्याचा पंचनामा’ या टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीवर अपमानास्पद वक्तव्य केले. यावेळी टास्कच्या दरम्यान जान्हवी ही तावातावाने बोलते की, “हे सगळे लोक घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाही. यांना फक्त अॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अॅक्टिंग करून दमले म्हणून ती अॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत”.
आणखी वाचा – “राखी सावंतला आणा तरच…”, Bigg Boss Marathi वरुन शशांक केतकरच्या बायकोचं वक्तव्य, म्हणाली, “कृपया…”
जान्हवीने केलेल्या या अपमानावरुन प्रेक्षकांनी नव्हे तर कलाकार मंडळींनीही तिला ट्रोल केलं. जान्हवीच हे वक्तव्य चुकीचं ठरवत साऱ्यांनी तिची शाळा घेतली. शिवाय भाऊच्या धक्क्यावरही रितेश यांनी तिची शाळा घ्यावी अशी विनंती अनेकांनी केली. नुकताच भाऊचा धक्कावरील एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश जान्हवीची शाळा घेताना दिसत आहेत.
आणखी वाचा – पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा जावेद अख्तर यांना पश्चाताप, म्हणाले, “लग्न यशस्वी न होण्यामागे…”
जान्हवीची आता दादागिरी बंद होणार. समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश जान्हवीला बाहेरचा रास्ता दाखवताना दिसणार आहे. “तुम्ही ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सगळ्यात वाईट स्पर्धक आहात. तुम्ही इथे सगळ्यांना म्हणता ना ए मी बाहेर काढेन. तुमचा माज, तुमची दादागिरी आज सगळं इथे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढणार. दरवाजा उघडा”, असं रितेश रागाने म्हणतो. यावर जान्हवी रडत रडत बाहेर जाताना दिसत आहे.