शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi मध्ये रंगणार नॉमिनेशन टास्क, कोण घराबाहेर जाणार? रंगली चर्चा

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 22, 2024 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update today episode nomination new promo shared on Instagram

Bigg Boss Marathi मध्ये रंगणार नॉमिनेशन टास्क? कॉन होणार नॉमिनेट? आणि कोण होणार सुरक्षित? चुरस वाढणार

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात चौथ्या आठवड्यात ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क खेळण्यात आला. या टास्कमध्ये दोन्ही टीममध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. टीम B ने घरात पहिल्यांदाच डोकं लावून या टास्कमध्ये खेळी खेळली. परिणामी दोन्ही टीम्स बीबी करन्सी जिंकू शकल्या नाहीत. सदस्यांना याचे परिणाम भोगावे लागणार असा सूचक इशारा ‘बिग बॉस’ने हा टास्क संपताना सर्वांना दिला होता. “आजची रात्री शांत झोपून घ्या कारण, उद्याचा दिवस सोपा नसेल” असं ‘बिग बॉस’ने सांगितलं आणि ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कचा शेवट झाला. यानंतर ‘बिग बॉस’ने दिलेल्या सुचनेनुसार घरातील सर्वांना याचे परिणाम भोगावे लागले ते म्हणजे घरातील बेड, वॉशरुम्स व खाण्या-पिण्याचे सामान जप्त करण्यात आले. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

 यानंतर ‘बिग बॉस’ अरबाजसमोर पर्याय ठेवतात. दोन्ही टीम सुख-सुविधांचा लाभ घेऊ शकतात पण, या बदल्यात तुम्हाला तुमची कॅप्टन्सी गमवावी लागेल. या टास्कमध्ये आता अरबाज दोन्ही टीमचा व घराचा विचार करत आपल्या कॅप्टन्सीवर पाणी सोडतो. त्यानंतर अरबाज आपली कॅप्टन्सी निक्कीला देतो. आपली कॅप्टन्सी सोडल्यामुळे अरबाजला दोन लाख रुपये बीबी करन्सी मिळते. यात सगळे स्पर्धक घरातील आवश्यक ते सामान घेतात. यानंतर आता घरात नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. या नवीन टास्कमध्ये घरातील इतर स्पर्धक आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी घरातील इतर स्पर्धकांना नॉमिनेट करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझ्या पातळीला उतरणं माझ्या बाबाला…”, पॅडी कांबळेच्या लेकीने जान्हवीला सुनावलं, निक्कीची सावली आहे असंही म्हणाली अन्…

या नवीन नॉमिनेशन टास्कचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात घरातील सदस्यांना त्यांच्या गळ्यातील एका सदस्याचा फोटो चुलीत टाकून त्यांना नॉमिनेट करण्याचं योग्य ते कारण द्यायचे आहे. यामध्ये प्रत्येक सदस्य आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी इतर स्पर्धकांना नॉमिनेट करणार आहे. या टास्कमध्ये घरातील स्पर्धकांची बाचाबाची झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या घरातील कोणता स्पर्धक आपल्या प्रतिस्पर्ध्याला नॉमिनेट करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आधी अपमान आता ढसाढसा रडत, हात जोडून जान्हवीने पॅडीची मागितली माफी, म्हणाली, “रागाच्या भरात बोलली पण…”

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात अरबाजने निक्कीला तिच्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून आपली कॅप्टन्सी दिली. यामुळे तिच्या टीममधील जान्हवी व वैभव यांच्या चेहऱ्यावरील रंगच उडाले होते. अशातच निक्की या नॉमिनेशन टास्कपासून सुरक्षित आहे. त्यामुळे आता नॉमिनेशन टास्कमध्ये कोण सुरक्षित होणार? आणि कोण नॉमिनेशनच्या प्रक्रियेत राहणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.   

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 Marathi NewsBigg Boss Marathi 5 News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Paaru Serial Update

Paaru Marathi Serial : आदित्यला पारू राखी बांधणार का?, दामिनीचा नवा डाव साध्य होईल का?, मालिकेत मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.