रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Badlapur School Sexual Abuse Case : “चौकात लिंग कापून…”, बदलापूर प्रकरणी कलाकारांचं सरकारडे साकडं, म्हणाले, “यांना दगडाने ठेचून…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 21, 2024 | 4:58 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Siddharth Chandekar, Surekha Kudchi, Kushal Badrike, Akshay Kelkar, Pandit, Shivali Parab, Priya Bapat and Riteish Deshmukh shared angry post

Badlapur School Sexual Abuse Case प्रकरणी मराठी कलाकारांचा संताप, पोस्ट शेअर करत आरोपीला शिक्षा देण्याची मागणी

Badlapur School KG Girl Sexual Abuse : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरला आहे. तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध केला. या घटनेचे पडसाद आता सर्व क्षेत्रातून उमटत आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी सर्व नागरिक रस्त्यावर उतरले. रेलरोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांमध्ये व नागरिकांमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती हाता बाहेर गेल्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज, अश्रूधुराचा वापर करावा लागला. बदलापूरमध्ये घडलेल्या ‘या’ प्रकरणावर मराठी कलाकारदेखील भडकले आहे. मराठी कलाकारांनी यासंबंधित सोशल मीडियावर संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. (Badlapur School Sexual Abuse Case)

सिद्धार्थ चांदेकरने याबद्दलची पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आता बोला की, मुलींनी आपली संस्कृती जपली पाहिजे, म्हणजे कुणीही तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही. त्या लहान मुलींना संस्कृती शब्दाचा अर्थही माहीत नसेल. शाळेच्या कपड्यातल्या ३-४ वर्षांच्या मुली आहेत त्या, ही विकृती आहे. या विकृत पुरुषांना मानवाधिकार नसावेत. कसलाही अधिकार नसावा, अगदी जगण्याचाही” तर कुशलने याबद्दल असं म्हटलं आहे की, “कुठल्याशा देशात म्हणे असल्या गुन्हेगाराला भर चौकात उभं करुन लिंग कापतात आणि एका देशात तर दगडाने ठेचुन मारतात. या यादीत माझा देश आला तर मला खूप आनंद होईल”.

तसंच सुरेखा कुडची यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सुरेखा यांनी असं म्हटलं आहे की, “बदलापूरमध्ये दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाले तेही त्यांच्या शाळेकया आवारात… मुलींचं वय साडे तीन वर्ष. आरोपीला पकडलं जातं पण अजूनही शिक्षा का होत नाही. ‘लडकी बचाओ, लडकी पढाओ’ म्हणणारे आता कुठे गेले? की स्वत:च्या घरात जोपर्यंत अशा घटना घडत नाहीत तोपर्यंत डोळे उघडणार नाहीत. शिक्षा एकच फाशी…”

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “विकून खाशील, तुझ्या देशाने रिजेक्ट केलं म्हणून…”, इरिनावर निक्कीचे आरोप, दमदाटी सुरुच

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्राम स्टोरीवर बदलापूर प्रकरणासंदर्भात असं म्हटलं आहे की, “बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्याला जातपात, धर्म नसतो… फक्त वृत्ती असते आणि तिच ठेचली पाहिजे. ज्यासाठी जाच बसणं गरजेचं आहे. नुसते कायदे कडक असून चालत नाही, ते आपल्याकडे आहेतच… अंमलात कधी आणायचे?आणि सगळ्यांना एक मनापासून विनंती, कृपया बलात्कारासारख्या घृणास्पद कृत्याचं कुठल्याही पद्धतीने राजकारण करू नये”.

आणखी वाचा – “रागात बोलते म्हणून ती चुकीची का?”, जान्हवीचं Bigg Boss मधील वागणूकीवरुन नवऱ्याचं भाष्य, म्हणाला, “शब्द चुकीचे पण…”

दरम्यान, बदलापूरमधील प्रकरणावर अनेक मराठी कलाकारांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आपला संताप व्यक्त केला आहे. मृण्मयी देशपांडे, अक्षय केळकर, प्रसाद ओक, शिवाली परब, प्रिया बापट, अभिजीत केळकर, नेहा शितोळे, सुरभी भावे, रितेश देशमुख  यांसारख्या अनेकांनी संतापजनक पोस्ट शेअर केल्या आहेत. बदलापूरच्या शाळेत घडलेली घटना अत्यंत निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे असं मत अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.        

Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
mohsin khan heartattack

मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला ३१व्या वर्षी हृदयविकाराचा झटका, म्हणाला, "कोणालाच सांगितलं नाही कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.