रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : जान्हवीने पॅडी कांबळेंच्या कामाचा अपमान करताच मराठी कलाकारांमध्ये मोठा राग, अभिनेता म्हणाला, “बस्स माफी नाही कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 21, 2024 | 12:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update actor Abhieet Kelkar comments on Janhvi Killekar insult to Pandharinath Kamble saying we will not forgive

Bigg Boss Marathi 5 मध्ये जान्हवीने पॅडी कांबळेंचा अपमान करताच भडकला मराठी कलाकार, अभिनेता अभिजीत केळकर म्हणाला, “माफ करणार नाही”

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा कालचा भाग चांगलाच गाजला. दोन्ही ग्रुपच्या सदस्यांना या टास्कमध्ये बीबी करन्सी जमा करता आलेली नाही आणि याचे परिणाम या आठवड्यात भोगावे लागतील असा इशारा ‘बिग बॉस’ने दोन्ही टिमला दिला आहे. तसंच यावेळी ‘सत्याचा पंचनामा’ या टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअर अपमानास्पद वक्तव्य केले. कोणीही एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका असं रितेशने ‘भाऊच्या धक्क्या’वर स्पष्ट केलं होतं. याआधी निक्कीने वर्षाताईंना मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल भाष्य केलं होतं. अशातच जान्हवीची जीभही घसरली आहे. नुकत्याच झालेल्या भागात जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे यांच्या अभिनय व करिअरबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. यावरून आता संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

टास्कच्या दरम्यान जान्हवी ही तावातावाने बोलते की, “हे सगळे लोक घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाही. यांना फक्त अ‍ॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले म्हणून ती अ‍ॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत”. जान्हवीच्या या वक्तव्यावर मनोरंजन विश्वातून जान्हवीवर संताप व्यक्त केला जात आहे. पॅडी यांना पाठींबा देत जान्हवीबद्दल अनेकांनी आपपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याबद्दल अभिनेता अभिजीत केळकरनेही पोस्ट शेअर करत त्याची बाजू मांडली आहे.  अभिजीतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “होय आमचा पॅडी ‘जोकर’च आहे. कुठल्याही परिस्थितीत लोकांना हसवणारा आणि हसवता हसवता डोळ्यात टचकन पाणी आणणारा, स्लॅपस्टिकचा हुकमी एक्का, गायन आणि नृत्याच्याही राज्यात सहज मुशाफिरी करणारा हरहुन्नरी, चतुरस्त्र अभिनेता”.

View this post on Instagram

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkar21)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग, आताही तेच करतो”, पॅडीच्या अभिनयावरुन जान्हवीचं वक्तव्य, रागात काहीही बोलून गेली अन्…; प्रेक्षक व कलाकारांचा संताप

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “बऱ्या-वाईट परिस्थितीतून, आयुष्यातल्या चढ-उतारांमधून ताऊन सुलाखून निघालेला, पाय घट्ट रोवून उभा असलेला मराठी मनोरंजन विश्वातला लखलखता तारा आणि या सगळ्याचा वागण्या-बोलण्यात कधीही कुठेही अभिनिवेश नसलेला उत्तम आणि संयमी माणूस… पॅडी मित्रा, तुझ्या संयमाला साष्टांग नमस्कार आणि तुला एक जोरदार जादू की झप्पी… मी आत्ताच तुझ्या अंतिम सोहळ्याची AV बघतोय… या पालापाचोळ्याला तू तुझ्या हुशारीने कसं “छू” केलं आहेस. त्यांचं त्यांनाही कळलं नाही. हा संयम ढळू देऊ नकोस आणि काहीही झालं तरी नाराज होऊ नकोस. तू आत भीड, आम्ही तुझ्यासाठी बाहेर आहोतच”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजवर कॅप्टन्सीची टांगती तलवार, स्वत:चा फायदा बघणार की घराचा?, निर्णय ठरणार लक्षवेधी

 दरम्यान, तसंच त्याने रितेश व कलर्स मराठी यांचा उल्लेख करत “पॅडीबद्दल जे बोललं गेलं आहे ते ही अक्षम्यच आहे. पॅडी कांबळे व वर्षाताईंनी कदाचित त्यांना माफ केलं असेल. पण आम्ही कधीच करणार नाही”. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘सत्याचा पंचनामा’ या टास्क दरम्यान एकाही सदस्याला बीबी करन्सी कमावता आली नाही. त्यामुळे याचे परिणाम या आठवड्यात भोगावे लागतील असा इशारा बिग बॉसने दोन्ही टीमला दिला आहे. त्यामुळे जान्हवीच्या या वक्तव्यावर आता ‘बिग बॉस’ नेमकं काय करणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Tags: Abhijeet Kelkar Angry Postbigg boss marathi 5Paddy aka Pandharinath Kamble
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Badlapur Sexual Assault Case Bollywood and Marathi actor Riteish Deshmukh demanded that accused punished with Chhatrapati Shivaji Maharaj era Chaurang shiksha

Badlapur Sexual Assault Case : "दोषींना महाराजांच्या काळातील चौरंग शिक्षा द्या...", बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुख भडकला, म्हणाला, "हा कायदा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.