रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चार वर्षांनी लेकाला परदेशात भेटायला गेले अशोक सराफ व निवेदिता सराफ, मामांचा वेस्टर्न लूक चर्चेत, म्हणाले, “अखेर आम्ही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 20, 2024 | 5:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nivedita Saraf Post

अखेर चार वर्षांनी निवेदिता सराफ व अशोफ सराफांनी घेतली लेकाची भेट, पोस्ट शेअर करत दाखविली झलक

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे निवेदिता सराफ आणि अशोक सराफ. अशोक मामा आणि निवेदिता ताई या जोडी बदल बोलावं तेवढं थोडंच आहे. आपल्या अभिनय कौशल्याने खूप मोठा काळ ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. एका पेक्षा एक चित्रपट, मालिका, नाटक त्यांनी कलाविश्वाला दिले आहेत. त्यांच्या कामाबरोबरच एक आदर्श जोडी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सिनेसृष्टीत ही जोडी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही निवेदिता या बऱ्यापैकी सक्रिय असतात. निवेदिता यांनी नुकतीच शेअर केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये निवेदिता, अशोक सराफ हे त्यांच्या लेकाबरोबर दिसत आहेत. (Nivedita Saraf Post)

अनेक कलाकारांची मुलं आपल्या आई वडिलांच्या पाठोपाठ सिनेविश्वात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळेला हे गृहीत धरलं जात की, अभिनेत्यांची मुलं अभिनेता किंवा अभिनेत्रीच होणार. परंतु काहींजण या गोष्टीला अपवाद असतात. आई- वडील दोघेही अभिनय क्षेत्रात असून अनिकेतने मात्र वेगळे क्षेत्र निवडले. शेफ होण्यासाठीची त्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे . घरात अभिनयाचा वारसा असताना वेगळी वाट निवडण्याची हिंमत त्याने दाखवली.

आणखी वाचा – Video : वाढदिवसाला क्रांती रेडकरला नवऱ्याने दिलं खास सरप्राइज, मंदिरातही गेले अन्…; व्हिडीओही केला शेअर

View this post on Instagram

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf)

अनिकेतने अभिनयाऐवजी शेफ म्हणून करिअर करायचे ठरवले. अनिकेतचे शिक्षण भारतात नव्हे तर फ्रान्समध्ये झाले आहे. तो एक उत्कृष्ट शेफ असून पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण खूपच छान बनवतो. युट्युबवर निक सराफ या नावाने त्याचे जेवण बनवतानाचे अनेक व्हिडीओ देखील आहेत. पॅरिस येथे अनिकेत असून आता निवेदिता सराफ व अशोक सराफ हे दोघेही लेकाला भेटायला परदेशात पोहोचले आहेत.

आणखी वाचा – Badlapur School Case : “आई म्हणून आमचा जीव टांगणीला”, बदलापूरमधील चार वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मराठी कलाकार भडकले, म्हणाले, “या देशात…”

“अखेर चार वर्षांनी आम्ही एकत्र आहोत”, असं कॅप्शन देत निवेदिता सराफ यांनी एकत्र फोटो शेअर केला आहे. निवेदिता व अशोक सराफ यांना बरेचदा कामानिमित्त त्यांच्या लेकाला भेटता येत नाही. मात्र आता अखेर चार वर्षांनी हे सराफ कुटुंब एकत्र आलेलं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर हे सराफ कुटुंब परदेशात एकत्र सुट्टीचा एन्जॉयही करत आहेत.

Tags: nivedita saraf and ashok sarafNivedita Saraf Postnivedita saraf son
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update paddy aka pandharinath kamble and janhavi killekar fight

Bigg Boss Marathi : "चल हट", पॅडीशी वाद घालताना जान्हवीची जीभ पुन्हा घसरली, कधी बोलणं सुधाणार?, आवाज चढवला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.