Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन सीझनची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात काय घडतं, काय बिघडतं हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील हा चौथा आठवडा वादाचा ठरत आहे. कारण टीम A मध्ये फूट पडल्याचं दिसत आहे. निक्की तांबोळी आणि तिच्या टीममधील सदस्यांची जोरदार भांडणं झाली आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या कालच्या भागात निक्की व घन:श्याममध्ये कल्ला झालेला पाहायला मिळाला. सत्याचा पंचनामा या टास्कमध्ये घनश्यामच्या निर्णयावरुन टीम A व टीम B मध्ये यांच्यात तुफान राडा झाला. या राड्यात जान्हवी व पॅडी यांच्यात चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली. (Bigg Boss Marathi 5)
टीम A मधील घनश्याम यांना सत्याच्या पंचनामासाठी एका खोलीत पाठवण्यात येते. तेव्हा त्याला ते दोन्ही टीमला खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करतात का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याच्या या उत्तरावर दोन्ही टीमकडून सहमती होणे आवश्यक असतं. पण ती सहमती होत नाही आणि टीम A ब टीम B यांच्यात राडा झाला. यावेळी त्यांच्यातील खेळ fair की unfair यावरून वाद झाला. यावेळी पॅडीने टीम A चुकीचा खेळ खेळत असल्याचा आरोप करतात.
तेव्हा निक्कीही मी माझ्या मित्रांबरोबर भेदभाव करतचं खेळणार असं म्हणते. डंके की चोटवर मी हे बोलत आहे आणि यापुढे सुद्धा मी त्यांच्याबरोबर भेदभाव भेदभाव करतच खेळणार”. यावर पॅडीही म्हणजेच तुम्ही चुकीचे खेळत आहात. महाराष्ट्र हे बघतोय. यावरून दोघांमध्ये चांगलेच वाद होतात आणि या वादात जान्हवी पॅडी यांना “चल हट हट” असं म्हणतात.
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या सीझनने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून मैत्री, भांडण-तंटे पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात दुसऱ्या दिवसापासून एकीकडे प्रेमाचे वारे वाहू लागले तर एकीकडे मैत्रीचे. मात्र दिवसेंदिवस ही मैत्री व प्रेम खेळासाठी कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.