शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“योगितावर अन्याय झाला”, Bigg Boss Marathiच्या घरातून योगिता चव्हाण बाहेर पडल्यानंतर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले, “तिला परत आणा कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 19, 2024 | 10:02 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 yogita chavan exit

'बिग बॉस मराठी'च्या घरातून योगिता चव्हाण बाहेर पडताच प्रेक्षकांची नाराजी, परत आणण्याची केली मागणी

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने साऱ्यांनाच वेड करुन सोडलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडणारा पहिला स्पर्धक म्हणजेच कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील. पुरुषोत्तम दादा पाटील यांना पहिल्याच आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घराला राम राम करावा लागला. त्यानंतर सलग दुसऱ्या आठवड्यात कोणताही स्पर्धक नॉमिनेट झाला नाही त्यामुळे साऱ्यांच्या नजरा तिसऱ्या आठवड्याच्या नॉमिनेशनकडे लागून राहिल्या होत्या. तिसऱ्या आठवड्याच्या या नॉमिनेशन प्रक्रियेत सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, निखिल दामले आणि योगिता चव्हाण ही स्पर्धक मंडळी होती.

एकूणच स्पर्धकांच्या मानेवर नॉमिनेशनची टांगती तलवार पाहायला मिळाली. घराबाहेर नेमका कोणता स्पर्धक जाणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या असताना सर्वप्रथम निखिल दामलेला ‘बिग बॉस’मराठीचा हा खेळ सोडावा लागला. मात्र काही वेळाने पुन्हा एकदा नॉमिनेशन प्रक्रिया करण्यात आली आणि प्रेक्षकांना खूप मोठा धक्का बसला. या नॉमिनेशन प्रक्रियेत अभिनेत्री योगिता चव्हाण हिचं नाव घेण्यात आलं. त्यामुळे योगितालाही ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपवून घराबाहेर पडावं लागलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तूच घात केला”, बहीण म्हणत मागे मागे फिरणारा छोटा पुढारी व निक्कीमध्ये मोठा वाद, म्हणाली, “तू फेक…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘बिग बॉस’च्या घरात गेले दोन आठवडे योगिताने खेळलेला खेळ पाहून प्रेक्षक मंडळींनी योगिताच्या एक्झिटवर नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळत आहे. योगिता उत्तम खेळ खेळत होती, निक्की व जान्हवी दोघींनाही तिने एकटीनं धडा शिकवला त्यामुळे तिचं खूप कौतुक होत होतं. योगिताने हा खेळ खेळायला हवा होता. ती फिनालेपर्यंत नक्की पोहोचली असती, असं म्हणत अनेकांनी तिची स्तुती केली आणि योगीताने या घरात पुन्हा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एण्ट्री घ्यावी अशी इच्छाही व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : किर्लोस्कर कंपनीचा खरा चेहरा कोण होणार?, दिशा-पारूमध्ये स्पर्धा, अहिल्यादेवी योग्य तो न्याय देतील का?

“योगिता छान खेळत होती. त्या पुढारीला वाचवण्यासाठी योगितावर अन्याय झाला. तो छोटा पुढारी राजकारन्यांच्या नावावर् कलंक आहे”, “वाइल्ड कार्ड म्हणून परत योगिताची एण्ट्री करा”, “आम्हाला योगिता पुन्हा हवी आहे. ती खूप चांगली आहे”, “योगिताचा गेम आवडला होता. कॅप्टनसीच्या टास्कमध्ये अपेक्षा होती पुढे चांगलं खेळेल पण ठीक आहे”, “योगिता तू जायला नको होतं”, “घनःश्यामला वाचवण्यासाठी योगितावर अन्याय केला”, अशा अनेक कमेंट योगितासाठी प्रेक्षकांनी केलेल्या पाहायला मिळत आहेत.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5yogita chavan exit
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi actress Pooja Sawant shared emotional post on social media in memory of her siblings on the occasion of Rakshabandhan.

नवऱ्यासह परदेशात राहणारी पूजा सावंत रक्षाबंधनला भावुक, म्हणाली, "मी तुमच्याबरोबर नाही आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.