शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : किर्लोस्कर कंपनीचा खरा चेहरा कोण होणार?, दिशा-पारूमध्ये स्पर्धा, अहिल्यादेवी योग्य तो न्याय देतील का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 19, 2024 | 9:20 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Marathi Serial todays episode

पारू मालिकेत ब्रँड अँबेसेडर पदासाठी कोणाची होणार निवड?, विजयी नेमकं कोण होणार?

Paaru Serial Update :  ‘पारू’ या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या असं पाहायला मिळत आहे की, ब्रँड अँबेसेडर होण्यासाठी दिशा व पारूमध्ये मोठी स्पर्धा सुरु असते. पारुला ही स्पर्धा मनापासून खेळायची नसते मात्र अहिल्यादेवींच्या शब्दाखातर आणि आदित्यला दिलेल्या शब्दाखातर पारू या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार होते. सुरुवातीला येतानाच पारू पारंपारिक अंदाजात येते तेव्हा दिशा सांगते की, तू या स्पर्धेचा नियम मोडला आहेस. तू तुझ्या देवी आईचं सगळं काही ऐकतेस ना मग स्पर्धेतून न खेळताच बाहेर पडणं ही त्यांची शिकवण आहे का? असे विचारताच देवी आईचा पारा चढतो.

एकीकडे आदित्यही पारूला म्हणतो की, हे तुला माझ्यासाठी करावंच लागेल. तुला माझ्यासाठी ही स्पर्धा जिंकावीच लागेल. तिने तुझ्या देवी आईच्या निर्णयावर शंका घेतली आहे त्यामुळे तुला हे सिद्ध करावेच लागेल. यावर पारू म्हणते की, “मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे आणि यामुळेच पारू देखील स्पर्धेला तयार होते”. त्यावर देवी आई पारूला म्हणतात की, हा तुझाच नव्हे तर माझ्या संस्कारांचा सुद्धा अपमान आहे. त्यामुळे पारू तुला काही झालं तरी या स्पर्धेत भाग घ्यावाच लागेल.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : भावा-बहिणीच्या नात्यात फाटाफूट, निक्की तांबोळी अन् छोटा पुढारीमध्ये मोठा वाद, नेमकी चूक कोणाची?

हे ऐकल्यावर पारू वेस्टर्न आऊटफिट घालून स्पर्धेत भाग घेण्यास सज्ज होते. पारुला हे जमू शकेल का याकडे साऱ्यांचेच डोळे लागून राहिलेले असतात. तेव्हा सगळ्यात आधी गणी पारूचं कौतुक करतो आणि सगळेच जण पारूकडे पाहतच राहतात. मात्र या वेळेला पारूने वेस्टर्न आऊटफिट वर हिल्सच्या चपला घातल्या नसल्याने तिला पुन्हा एकदा बोलणी ऐकावी लागतात.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातून निखिल दामलेपाठोपाठ योगिता चव्हाणही घराबाहेर, सदस्यांना अश्रू अनावर

त्यानंतर दामिनी स्वतःच्या पायातील चपला पारूला देते आणि सांगते की, आता हे हिल्स घाल आणि त्यानंतर तुझा आऊटफिट पूर्ण होईल. आणि तू सुंदर दिसशील. आता पारू त्या चपलांवर चालू शकेल का?. तसेच मालिकेच्या पुढील भागात दाखवण्यात आल्याप्रमाणे सर्वाधिक मार्क्स हे दिशाला मिळालेले असतात त्यामुळे दिशा स्वतः आदित्यला सांगते की आता तू माझ नाव ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित कर. दिशा खरंच ब्रँड अँबेसेडर होईल का, की काही चमत्कार होईल? हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serialPaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update Abhijeet Sawant feels betrayed when he hears Ankita Walawalkar Pandharinath Kamble and Dhananjay Powar gossiping about him.

Bigg Boss Marathi : अंकिता, पॅडी व धनंजयने केलेली अभिजीतची चुगली, रितेशने सत्य दाखवल्यानंतर टीममध्ये फुट, नाराजी अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.