शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi मधील ‘या’ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार, कुणाला मिळणार घरचा आहेर?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 18, 2024 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 todays elimination suraj chavan yogita chvan abhijeet sawant and nikhil damle nominated

Bigg Boss Marathi 5 मधून कोणत्या स्पर्धकाचा प्रवास संपणार आहे? जाणून घ्या...

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ म्हटलं की नॉमिनेशन हे साहजिकच आलं. घरातील सदस्य स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न करतो. याचसाठी तो घरातील इतर सदस्यांना नॉमिनेट करत असतो. आता ‘बिग बॉस मराठी ५’ चा तिसरा आठवडा झाला आहे. मागील आठवडयात घरात एलिमिनेशन झाले नव्हतं. मात्र या आठवड्यात घरातील एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. त्यात या आठवड्यात फक्त ४ सदस्य नॉमिनेट झाले आहेत, त्यातील सगळ्यात कमी वोट पडलेला सदस्य आज घराबाहेर जाणार आहे. (Bigg Boss Marathi 5 daily updates)

या आठवड्यात योगिता, निखिल, सूरज व अभिजीत सावंत हे चार सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. अरबाज व अभिजीत यांना मिळालेल्या स्पेशल पॉवरमध्ये अरबाजने निक्कीला आणि अभिजीतने पॅडी कांबळे यांना नॉमिनेशनपासून वाचवले होते. मात्र वैभव त्याला मिळालेल्या पॉवरमध्ये नॉमिनेशनपासून घन:श्यामला वाचवतो आणि त्याच्या याऐवजी अभिजीतला नॉमिनेट करतो. त्यामुळे आता बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी सूरज, योगिता, निखिल व अभिजीत हे चार स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – तेजस्विनी पंडितच्या नवीन चित्रपटाची घोषणा, “मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा” लिहिलेल्या हिरोची चर्चा, पोस्टरने वेधलं लक्ष

तसंच या चौघांपैकी सूरजला संपूर्ण महाराष्ट्राचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे त्याचे वोट्स खूप जास्त आहेत. यामुळे तो यावेळेसही सुरक्षित आहे. तर त्यापाठोपाठ अभिजीतचा गेम दिसल्याने चाहते त्यालाही वोट करत आहेत, या आठवड्यात सुरज आणि अभिजीत यांना सगळ्यात जास्त वोटिंग झाली आहे. मात्र योगिता व निखिल दोघेही बॉटम २ मध्ये आहेत. योगिताने स्वतचं घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र या आठवड्यात योगिताने जान्हवी आणि निकी यांच्या नाकात दम आणला. ती एकटी त्या दोघांवरही भारी पडली होती.

आणखी वाचा – Kolkata Rape Case प्रकरणी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना विनंती, म्हणाला, “जसं राम मंदीर उभारण्यात आलं तसं…”

त्यामुळे आता या दोघांपैकी योगिताचे वोट जास्त आहेत. मात्र निखिलचा गेम खराब असल्याने तो लवकरच घराबाहेर आऊ शकतो असं दिसत आहे. सध्याच्या वोटिंगनुसार निखिलला कमी मत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता योगिता व निखिल यापैकी नेमकं कोण बिग बॉसच्या घराबाहेर जाणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Tags: abhijeet sawantNikhil DamleSuraj ChavanYogita Chavhan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Next Post
Kolkata Rape Case actor Prathamesh Parab wife Kshitija Ghosalkar sensitive poem video viral

Kolkata Rape Case प्रकरणावर लोकप्रिय अभिनेत्याच्या बायकोची संवेदनशील कविता, म्हणाली, “मी साडी नेसून फिरले तरी...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.