‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रमावर महाराष्ट्रातील सर्वच प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजनही करतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेरावही तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मने जिंकते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील लॉली या भूमिकेसाठी नम्रता चांगलीच चर्चेत असते. कॉमेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या नम्रताने कलाश्रेत्रात स्वतःचे स्थान स्वतः कमावले आहे.(Namrata Sambherao Post)
नम्रता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. तसेच अधून मधून चित्रपटांमध्येही काम करते. सध्या नम्रता ‘कुर्रर्रर्र’ या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत आहे. ती तिच्या बाळापासून म्हणजे रुद्राज पासून लांब आहे, आणि अमेरिकेला जाऊन बरेच दिवस झाले असल्याने आता तिला तिच्या लेकाची आठवण साठवतेय. सोशल मीडियावरून नम्रता तिचा मुलगा रुद्राजचे बरेच व्हिडीओ शेअर करत असते. आताही रुद्राजचा एक क्युट व्हिडीओ तिने शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रुद्राज ‘एकटी एकटी घाबरलीस ना’ हे गाणं गाताना दिसतोय. चला ऐकूयात रुद्राजने आईसाठी गायलेलं गाणं.

पहा नम्रताची लेकाच्या आठवणीतली पोस्ट (Namrata Sambherao Post)
रुद्राजच्या या व्हिडीओसोबत नम्रताने एक पोस्ट शेअर केली आहे, ‘एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही’ हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा डोळे पाणवतात लवकरच परत येतेय कधी एकदा तुला घट्ट मिठी मारतेय असं झालंय कारण मी खरंच शूर नाही हे मी इतकं लांब आल्यावर माझ्या लक्षात आलंय कारण क्षणोक्षणी तुझी आठवण आली पण आता मला खात्री आहे माझा सगळा भित्रेपणा छूमंतर होणार कारण लवकरच मी माझ्या शूर बाळाला भेटणार आहे, असं म्हणत लेकाच्या आठवणीत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.(Namrata Sambherao Post)
हे देखील वाचा – सध्या रंगभूमी गाजवणारी ही नाटकं आवर्जून पाहा
नम्रता संभेराव ही अभिनेत्री शो असो किंवा नाटक कुठेही प्रेक्षकांना हसवण्यासाठी जीवतोड मेहनत घेताना दिसते. ती सोशल मिडियावरही चांगलीच सक्रीय असते. महाराष्ट्राची हास्यजत्रा मध्ये ती कधी लॉली बनून प्रेक्षकांना पोट धरून हसवते तर कधी तिची साध्या आईची भूमिकासुद्धा भाव खाऊन जाते. तिला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे प्रसिद्धी मिळाली असली तरी तिने अनेक नाटकांमध्ये देखील विविध भूमिका साकारल्या आहेत. ही नाटक हाऊसफुलही ठरली आहेत. तर बॉक्स ऑफिसवर धमाका करणाऱ्या ‘वाळवी’ चित्रपटात ही नम्रताने काम केले आहे.