शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भीती पाहिजे, आता घुसून मारणार”, सूरज टास्कमध्ये बिनधास्त नडत आहे पाहून उत्कर्ष शिंदे भारावला, म्हणाला, “तू तर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 16, 2024 | 12:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5

'बिग बॉस मराठी' च्या घरात सूरज चव्हाणला खेळताना पाहून उत्कर्ष शिंदेने केलं कौतुक, म्हणाला, "क्या बात है सूरज"

Bigg Boss Marathi 5 :  ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने जोर धरलेला पाहायला मिळत आहे. स्पर्धक मंडळींची स्वतःला सिद्ध करण्यासाठी चुरशीची लढाई पाहायला मिळाली. यावेळी पहिले दोन आठवडे कायम शांत राहणाऱ्या, गेम न समजलेल्या सूरज चव्हाणने स्वतःचा इंगा दाखवायला सुरुवात केली आहे. मात्र आता सूरजने स्वतःमध्ये बदल केला असून त्याने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सूरजचं कौतुक केलं जात आहे. सुरुवातीला धड बोलताही न आल्याने सूरज शांत होता. मात्र ‘बिग बॉस’ने आणि रितेश देशमुखने त्याला न घाबरता खेळण्याचा सल्ला दिला.

याशिवाय रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर प्रेक्षकही तुझ्यावर प्रेम करतात, संपूर्ण महाराष्ट्र प्रेम करतो त्यामुळे तू ही लढाई लढ असे सांगितल्यावर सूरजने स्वतःमध्ये बदल केला असून त्यांने लढाई लढण्यास सुरुवात केली. नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये सूरज पेटून उठलेला पाहायला मिळाला. तर घरातले इतर सदस्यही सूरजला सपोर्ट करताना दिसत आहेत. सोशल मीडियावरही त्याचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. ‘बिग बॉस मराठी’ वर टिप्पणी करणाऱ्या अभिनेता, गायक उत्कर्ष शिंदेने याआधीही ‘बिग बॉस मराठी’च्या स्पर्धकांबाबत भाष्य केलं. दरम्यान त्याने अनेकदा सूरजला सपोर्टही केलेला पाहायला मिळाला. आता सूरजचा हा खेळ पाहून उत्कर्षने केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या दीड वर्षांनंतर देवोलीना भट्टाचार्जी आई होणार, थाटामाटात पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

उत्कर्षने सूरजच्या समोर आलेल्या प्रोमोखाली कमेंट करत असं म्हटलं आहे की, “‘डर होना चाहिये और वो भी सामने वाले के दिल मै होना चाहिये. क्या बात है सूरज. एक लाईन आठवली सूरजचा कॉन्फिडन्स बघून. जब भी मारुंगा घूस के मारुंगा”, असं म्हटलं आहे. तर ‘बिग बॉस’ फेम मीनल शाहनेही या प्रोमोखाली कमेंट करत, “सूरज तर फायर आहे. आता मज्जा येईल”, असं म्हणत त्याच कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : छोटा पुढारीची निक्कीशी जवळीक, मांडीवर डोकं, हातात हात घेऊन बसला अन्…; घरातील सदस्यांनीच उडविली खिल्ली

कलर्स मराठी वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये सूरज, वैभवला असं सांगत आहे की, “मी त्याला अजून मारलं नाही”. त्यावर वैभव त्याला विचारतो, “तू असे हात पाय करु नकोस”. वैभवच्या बोलण्यावर सूरज संतापतो आणि म्हणतो, “माझं मी बघेन”. त्यानंतर सूरज व अरबाज यांच्यामध्ये धक्काबुक्की होते. सूरज, अरबाजला भिडताना दिसत आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi 5utkarsh shinde support suraj chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Vaibhav Chavan Irina Rudakova and Arbaaz Patel Nikki Tamboli are get close in the house

Bigg Boss Marathi : वैभवच्या मांडीवर पाय ठेऊन बसली इरिना, तर दुसरीकडे एकमेकांच्या अगदी जवळ आले अरबाज-निक्की, नक्की चाललंय काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.