Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या पहिल्या आठवड्यातच घरात प्रेमाचे वारे वाहताना दिसत होते. अरबाज पटेल व निक्की तांबोळी यांची लव्हस्टोरी एकीकडे सुरू झाली तर, आणखी दोन स्पर्धकांमध्ये खास नातं पाहायला मिळत आहे ते म्हणजे वैभव व इरीना. वैभवने इरिनाचं वारंवार कौतुक केल्याचे आणि तिला जास्त महत्त्व दिल्याचे अनेकदा पाहायला मिळालं आहे. निक्की आणि अरबाजचा खास बॉण्ड नेटकऱ्यांच्या आणि ‘बिग बॉस’प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात आणखी एक लव्हस्टोरी फुलणार की काय? असं वाटू लागलं आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
‘बिग बॉस’च्या घरात एकत्र राहिल्यामुळे अनेकदा जवळीक निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच या सीझनमध्येही काही स्पर्धकांमध्ये ही जवळीक पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या भागामध्ये वैभव व इरीना हे एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी इरीनाने वैभवच्या मांडीवर पाय ठेवले असल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. तर आजच्या भागात निक्की व अरबाज यांच्यातील वाढती जवळीक पाहायला मिळणार आहे. अरबाजने निक्कीच्या कमरेला हात लावल्याचे दिसत आहे.
बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव आणि परदेसी गर्ल इरिना यांच्यात खरंच प्रेम फुलतंय की नाटक आहे हे आगामी भागांमधून प्रेक्षकांना पाहता येईल. अरबाज आणि निक्कीच्या लव्हस्टोरीत सध्या रुसवेफुगवेही दिसत आहेत. निक्कीनं अभिजीत सावंतची बाजू घेतल्यानं अरबाज काहीसा नाराज झाला होता. त्यामुळं दोघांमध्ये अबोला होता. पण अरबाजनं निक्कीची समजूत काढल्यानं आता दोघेही बोलत आहेत.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वात रोज रोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. केवळ ‘बिग बॉस’च नाही तर स्पर्धकही स्पर्धकांना नवनवीन सरप्राइजेस देत आहेत. त्यामुळे आता नवीन सरप्राइजसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.