शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुला अजून हाणलं नाही”, सूरजचा वैभवला दम, अरबाज-निक्कीवरही पडला भारी, नवा गेम पाहून सर्वच थक्क

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 16, 2024 | 9:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update suraj chavan fight with arbaaz patel nikki tamboli janhavi killekar and vaibhav new promo

Bigg Boss Marathi 5 सूरज चव्हाणचा गोलीगत पॅटर्न पडणार भारी, अरबाज व वैभवला पुरुन उरणार, नवीन प्रोमो व्हायरल

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सध्या चांगलाच गाजतोय. यंदाच्या सीझनमध्ये काही वेगळे चेहरे पाहायला मिळत आहेत. यातील काही किएटर्स आहेत कर काही अभिनेते. दिवसेंदिवस हे किएटर्स कलाकारांवर भारी पडताना दिसत आहेत. यातीलच एक सर्वांच्या ओळखीचा चेहरा म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. गोलीगत सूरजचा हा नवीन पॅटर्न सध्या सर्वच प्रेक्षकांना आवडू लागला आहे. दिवसेंदिवस दिवस त्याच्या खेळात रंगत येत चालली असून ही रंगत त्याच्या अनेक चाहत्यांच्या पसंतीस पडू लागली आहे. सुरुवातीला खेळापासून व टास्कपासून दूर राहणारा सूरज आता प्रत्येक खेळात आणि प्रत्येक टास्कमध्ये अगदी हिरीरीने सहभागी होत आहे आणि त्याचा हा सहभाग पाहून प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

अशातच सूरज पुन्हा एकदा अनेकांच्या कौतुकाचे कारण बनला आहे त्याचं कारण म्हणजे सूरजची नवीन खेळी. ‘बिग बॉस’च्या घरात नुकताच कॅप्टन्सीचा टास्क रंगणार आहे आणि या टास्कमध्ये सूरज चव्हाण त्याचा गोलीगत पॅटर्न वापरून खेळात नवी रंगत आणणार आहे. याचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. ‘बिग बॉस मराठी’चा आजच्या एपिसोडचा पहिला प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोने सर्वांनाच थक्क केलं आहे. सूरज चव्हाणचा गोलीगत पॅटर्न या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “गद्दार कोण?”, टास्कदरम्यान अरबाज-वैभवची वागणूक पाहून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने विचारला जाब, तर सूरजचं कौतुक, म्हणाल्या, “काहीतरी शिजत होतं…”

या नव्या प्रोमोमध्ये “माझं मी बघेन”, म्हणत निक्की, अरबाज आणि जान्हवी या तगड्या सदस्यांबरोबर सूरज चांगलाच भिडताना दिसत आहे. सूरज चव्हाण आता आपले खरे रंग दाखवताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर तो अरबाजलादेखील थेट भिडलेला या प्रोमोमध्ये दिसून येत आहे. सुरुवातीपासूनच त्याला चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा आहे. चेहऱ्यावर हसू ठेवणाऱ्या सूरजच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडून गेलंय. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अनेकदा तो याबद्दल भाष्य करताना दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सूरजचं चांगलच कौतुक होत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : प्रेमात मिळाला मोठा धोका, गोलीगत सूरजने पहिल्यांदाच सांगितली प्रेमकहाणी, म्हणाला, “गोरापान मुलगा आवडला तर…”

दरम्यान, या नवीन प्रोमोमधून सूरज त्याच्या हटके स्टाइलने सर्वानाच थक्क करताना दिसून येत आहे. अरबाज, वैभव, निक्की व जान्हवी यांना तो पुरून उरत आहे. त्यामुळे आता या कॅप्टन्सी टास्कमध्ये तो आणखी नवीन रंगत काय आणणार?तो कॅप्टन पदाचा दावेदार होणार का? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: Arbaaz Patelbigg boss marathi 5nikki tamboliSuraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Paaru Serial Update todays episode update

Paaru Marathi Serial : दिशा-पारुमध्ये होणार स्पर्धा?, कोण विजयी होणार?, अहिल्यादेवी योग्य तो न्याय देणार का?, मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.