शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : घनःश्यामला सेफ करत वैभवने अभिजीतला केलं नॉमिनेट, जान्हवी व निक्की भडकल्या, म्हणाल्या, “चुकीचा निर्णय आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 14, 2024 | 11:24 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
nikki and jahnavi angry on vaibhav chavan Bigg Boss Marathi 5

नॉमिनेशन टास्कमधील वैभव चव्हाणचा निर्णय चुकला म्हणत निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर भडकली

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड केलं आहे. एकापेक्षा एक हे स्पर्धक असून ते उत्तम खेळ खेळताना दिसत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात दोन गट पडले असून दोन्ही गटांत टास्कमध्ये बराच वाद पाहायला मिळतो. ‘बिग बॉस’ मध्ये यंदा केवळ कलाकारांना नव्हे तर रील स्टार, रॅपर, गायक अशा विविध क्षेत्रातील कलाकारांना संधी दिली असून प्रत्येक क्षेत्रातील ही कलाकार मंडळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्तम खेळ खेळताना दिसत आहेत.

‘बिग बॉस’च्या घरात दोन गट पडलेले पाहायला मिळत आहेत. पहिल्या गटात निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव, घनःश्याम, इरिना हे सदस्य पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या गटात अभिजीत, वर्षा, पॅडी, सूरज, अंकिता, निखिल, योगिता, धनंजय हे कलाकार दिसत आहेत. दोन्ही गटात बरेच वाद सुरु असलेले पाहायला मिळाले. अशातच नॉमिनेशन प्रक्रियेत वैभवला पॉवर कार्ड मिळालं असून एका स्पर्धकाला नॉमिनेट करायची संधी मिळाली. यावेळी वैभवने नॉमिनेट प्रक्रियेत घेतलेला निर्णय त्याच्या टीममधील इतर स्पर्धकांना खटकला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आईच्या भावना यांना काय कळणार?”, वर्षा उसगांवकरांना मूल नाही हे माहीत असूनही निक्कीने सुनावलं, नंतर माफीही मागितली पण…

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

या नॉमिनेशन प्रक्रियेत वैभवने घनःश्यामला सेफ केलं असून त्याने अभिजीतला नॉमिनेट केलं आहे. त्याचा हा निर्णय सह स्पर्धकांना खटकलेला पाहायला मिळत आहे. यावेळी वैभव म्हणतो, “मला घनःश्यामला सेफ करायचं आहे. त्याच्या जागी मी अभिजीतला नॉमिनेटला करत आहे”. वैभवचा हा निर्णय ऐकून निक्की, जान्हवी संतापतात. निक्की यावर म्हणते, “काय चुकीचा निर्णय घेतो. तू आमचीच मारली आहेस. तू तिच्याशी भांडतोस. तिला बाहेर काढायची ही सुवर्णसंधी होती”, असं म्हणते.

आणखी वाचा –“बाबा तुमची आठवण येतेय”, विलासराव देशमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त रितेश-जिनिलीया भावुक, फोटोही केले शेअर

यावर जान्हवी निक्कीला म्हणते, “कुठल्या डोक्याने विचार करतात यार”, असं म्हणत चिडचिड करत पाय आपटते. तर निक्की व अरबाज बोलत असतात. तेव्हा निक्की अरबाजला बोलते, “मला असं वाटत की तिला कुस्ती खेळायला जमते गेम खेळायला जमत नाही”

Tags: bigg boss marathi 5bigg boss marathi season 5nikki tamboli angry on vaibhav chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update second captaincy task in contestants new promo viral on social media

Bigg Boss Marathi मध्ये कॅप्टन्सीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले सदस्य, अभिजीतच्या पायाला दुखापत, निक्की मार मार म्हणून ओरडली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.