रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss ची गुगली, नॉमिनेशन कार्यात आणला मोठा ट्विस्ट, या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 14, 2024 | 11:19 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update Contestants Yogita Chavan , Nikhil Damle, Suraj Chavan and Abhijeet Sawant nominated to exit know more

Bigg Boss Marathi 5 मधून बाहेर जाण्यासाठी योगिता, निखिल, सूरज व अभिजीत नॉमिनेट, कोण जाणार घराबाहेर?

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ आणि नॉमिनेशन हे जणू एक समीकरणच आहे. घरातील सदस्य स्वतःच्या प्रगतीसाठी पुढे जाण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी इतर सदस्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करतात. याचसाठी घरातील एक स्पर्धक इतर स्पर्धकांना नॉमिनेट करतो. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या कालच्या भागातदेखील ही प्रक्रिया पार पडली आणि यात बिग बॉसने नवीन ट्विस्ट आणत ही नॉमिनेशन प्रक्रिया आणखी रंगतदार बनवली. याआधी घरातील १५ स्पर्धकांपैकी एकूण सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. यात सूरज, पॅडी, निखिल, योगिता, घन:श्याम व निक्की हे नॉमिनेट झाले होते. मात्र आता यापैकी दोन सदस्य सुरक्षित झाले आहेत. (Bigg Boss Marathi 5 daily update)

घरातील सूरज, पॅडी, निखिल, योगिता, घन:श्याम व निक्की हे सदस्य नॉमिनेट झाले होते. मात्र यापैकी घन:श्याम व पॅडी हे दोन सदस्य नॉमिनेशनपासून सुरक्षित झाले आहेत. ‘बिग बॉस’ने अभिजीत व अरबाज यांना पॉवर कार्ड वापरायचा नवीन टास्क दिला होता. यामध्ये त्यांना  काही पॉवर कार्ड वापरायला सांगितले होते आणि यात या दोघांनी नॉमिनेशनपासून वाचवण्याचे पॉवर कार्डचा वापर केला. यावेळी अभिजीतने पॅडीला सुरक्षित केलं तर अरबाजने निक्कीला नॉमिनेशनपासून सुरक्षित केलं.त्यानंतर ‘बिग बॉस’ने या खेळामध्ये नवीन ट्विस्ट आणला आणि घरातील दोन टीमपैकी जिंकलेल्या टीमला पॉवर कार्डचा वापर करायला सांगितलं.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “आईच्या भावना यांना काय कळणार?”, वर्षा उसगांवकरांना मूल नाही हे माहीत असूनही निक्कीने सुनावलं, नंतर माफीही मागितली पण…

यामध्ये टीम A ने आधीचा टास्क जिंकला होता. त्यामुळे या टीमपैकी कुणीतरी एकाने पॉवर कार्डचा उपयोग करावा हे सांगितलं. तेव्हा निक्की, अरबाज, घन:श्याम, जान्हवी या टीमने वैभवचं नाव निवडलं. यात वैभवला बिग बॉसने पॉवर कार्डचा वापर करताना पाच कार्डबद्दल सांगितले. तेव्हा वैभवने घरातील कोणत्याही स्पर्धकाला सुरक्षित करुन त्याऐवजी दुसऱ्या स्पर्धकाचे नाव घेण्याचे कार्ड वापरले. त्यामुळे वैभवने घन:श्यामला नॉमिनेशनपासून सुरक्षित केलं आणि त्याऐवजी त्याने अभिजीतचं नाव घेतलं.

आणखी वाचा – “बाबा तुमची आठवण येतेय”, विलासराव देशमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त रितेश-जिनिलीया भावुक, फोटोही केले शेअर

त्यामुळे आता नॉमिनेशन प्रक्रियेतील एकूण सहा स्पर्धकांपैकी पॅडी, घन:श्याम व निक्की हे तीन स्पर्धक सुरक्षित झाले आहेत. तर योगिता, निखिल, सूरज व अभिजीत हे स्पर्धक नॉमिनेशन प्रक्रियेत आहेत. म्हणून आता घराबाहेर जाण्याच्या शर्यतीत योगिता, निखिल, सूरज व अभिजीत यांच्यात चांगलीच चुरस रंगणार आहे. त्यामुळे आता घराबाहेर नक्की कोण जाणार? आणि कोण राहणार? हे येत्या शनिवार-रविवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Tags: abhijeet sawantNikhil DamleSuraj ChavanYogita Chavhan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
nikki and jahnavi angry on vaibhav chavan Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi : घनःश्यामला सेफ करत वैभवने अभिजीतला केलं नॉमिनेट, जान्हवी व निक्की भडकल्या, म्हणाल्या, "चुकीचा निर्णय आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.