मराठी हिंदी सिनेसृष्टीमध्ये आवर्जून घेतलं जाणार नाव मृणाल कुलकर्णी, मराठी , हिंदी सिनेसृष्टी, मालिका विश्व् यांमध्ये त्यांनी आपल्याला अभिनयाची छाप चांगलीच पाडली आहे.अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या कडे पाहिलं जात. अभिनेत्री सोबत दिग्दर्शिका म्हणून ही त्यांनी त्यांचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.त्यांच्या एव्हरग्रीन व्यक्तिमत्वामुळे त्या कायमच कौतुकाच्या मानकरी ठरल्या आहेत. (Mrinal Kulkarni Struggle)
स्वामी या मालिकेपासून त्यांनी सुरुवात केली, आणि तेव्हा पासून आज पर्यंत अगदी काटेकोरपणे त्या त्यांच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यांच्या अनेक भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून करत आहेत. श्रीकांत, द ग्रेट मराठा, आणि लहानां पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना लक्षात राहिलेली सोनपरी. एकाच व्यक्तीच्या इतक्या भूमिका कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या लक्षात राहण्यासाठी त्या भूमिकेत कलाकाराला जीव ओतावा लागतो. आणि त्या भूमिकेला तितकं आपलंस करावं लागत.

हे देखील वाचा : ..म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपटाला मृणाल कुलकर्णी यांनी दिला होता नकार
मृणाल कुलकर्णी यांच्या विषयी बोलताना त्यांच्या अवंतिका या मालिकेचं नाव आल्याशिवाय राहत नाही.अनेक हिंदी मालिका केल्यावर त्यानी अवंतिका ही मराठी मालिका केली. अवंतिका जवळजवळ चार वर्ष चालली आणि बरीच गाजली.अवंतिका ही एका अशा स्त्री ची कथा आहे जिच्या सुखी संसाराचं स्वप्न एका क्षणात पुसलं जात.
पाहा का नाकारल्या मृणाल यांनी मराठी मालिका ? (Mrinal Kulkarni Struggle)
अवंतिका ही मालिका संपल्या नंतर मृणालना अनेक मालिकांच्या ऑफर्स येत होत्या. परंतु, त्यांनी त्या स्वीकारल्या नाहीत. त्यामागे त्यांची अशी काही कारण त्या म्हणतात. लोक तेव्हा त्यांना अवंतिका म्हणून ओळखत होते. लोकांच्या मनावर त्या भूमिकेचा जबरदस्त पगडा होता.तो पगडा काही वर्ष तरी तसाच रहावा अशी त्यांची इच्छा होती. आणि मुख्य म्हणजे त्या वेळी त्यांनी दुसरी भूमिका केली असती तर, त्या नव्या भूमिकेवर अन्याय झाला असता, असं त्यांना वाटत होत. कारण लोक त्यांच्याकडे अवंतिका म्हणूनच बघायचे. म्हणून त्यांनी थांबायचं ठरवलं होत. (Mrinal Kulkarni Struggle)

खरतर सतत मागणी असताना एखाद्या कलाकाराने असं थांबणं यासाठी खूप धाडस लागत. आणि मृणाल मध्ये ते धाडस होत. जवळजवळ पाच- सहा वर्ष नंतर त्यांनी ‘राजा शिवछत्रपती’ आणि ‘गुंतता हृदय हे’ या मालिका केल्या. मृणाल म्हणायच्या तुम्ही काही वर्ष नंतर आलात, की लोकांना पण फ्रेशनेस वाटतो. येईल ते सगळंच करत गेलो, तर स्वतःलाच स्वतःचा कंटाळा येतो. स्वतःला कधी प्रेक्षकांवर लादु नये.लोकांनी आपली वाट बघायला हवी.
हे देखील वाचा : ‘शरीरप्रदर्शन करायची माझी….’म्हणून अलका कुबल यांनी नाकारले हिंदी चित्रपट
स्पर्धेच्या जगात जिथे लोक जास्तीत जास्त काम आपल्याला कास मिळेल या वर लक्ष केंद्रित करतात. त्या विचारसरणी मध्ये इतका खोलवर विचार करणं हे फार क्वचितच पाहायला मिळते. मृणाल कुलकर्णीनी कायम त्यांची विचारसरणी जपली म्हणून आज हि त्या तितक्याच जोमाने अनेक नवीन जुन्या कलाकारांसोबत टिकून आहेत. (Mrinal Kulkarni Struggle)