शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी यांना नडणार, ट्रॉफीही माझीच”, सूरज चव्हाणचा Bigg Boss Marathi मधील गेम ऑन , म्हणाला, “खूप बेक्कार…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 13, 2024 | 10:40 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi season 5 suarj chavan

गुलिगत सूरजचा घरातली इतर सदस्यांना इशारा, ट्रॉफी जिंकणार असल्याचंही सांगितलं

Bigg Boss Marathi season 5 :  ‘बिग बॉस’ मराठीच घर म्हटलं की वादाची ठिणगी ही आलीच. ‘बिग बॉस मराठी’च्या मानाच्या ट्रॉफीसाठी इथं सगळे खेळ खेळताना दिसतात. सततचे वाद, भांडण, मानसिक संतुलन बिघडणे या सगळ्याच श्रेय हे ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीप्रयत्न पोहोचवतं. सगळेच जण ‘बिग बॉस’ची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. यंदाच्या पर्वातही असलेले १५ स्पर्धक ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीकडे आशेने बघताना दिसत आहेत. या पर्वातील सर्वाधिक उत्तम खेळ खेळणारा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरुन कौतुक केलं जात आहे.

इतकंच नव्हे तर सूरजला प्रेक्षकांकडून, कलाकारांकडूनही भरपूर पाठिंबा मिळताना पाहायला मिळतो. आता सूरज सध्या ट्रेंडिंगमध्ये आला असून तो चर्चेत आहे. सुरुवातीच्या दिवसात सूरजला गेम कळला नव्हता त्यामुळे सूरज थोडासा घाबरायचा. त्याच नीट वागणं, बोलणं प्रेक्षकांना कळत नसेल अशी भीती त्याला वाटत होती. मात्र आता ही त्याची भीती दूर पळाली असून त्याने खेळ खेळायला सुरुवात केली आहे. आता सूरजने स्वतःचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – Munawar Faruqui : कोकणी माणसांना शिवी दिली, खिल्ली उडवली अन्…; मुनव्वर फारुकीच्या ‘त्या’ वक्तव्यावर वाद, मनसे आक्रमक

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकावी अशी अपेक्षाही नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूरजने बोलून दाखविली. सूरज सध्या त्याचा खेळ खेळत असून प्रेक्षकांनाही हा त्याचा खेळ आवडू लागला आहे. सूरजने नुकतीच अभिजीतकडे ट्रॉफी जिंकण्याची इच्छा बोलून दाखविली. यावेळी अभिजीतने ही सूरजची इच्छा पूर्ण व्हावी आणि आम्हाला तू ट्रॉफी जिंकलेली आवडेल असंही म्हटलं.

आणखी वाचा – Video : एकाच ताटात जेवले निक्की व डीपी, तेच पाहून बायकोचा संताप, म्हणाली, “मी तर तुम्हाला भरवते पण…”

सूरज म्हणतो, “शेवटी ट्रॉफी मीच नेणार. इथे कोणाला हात लावू देणार नाही. इथे कोण आलं शेवट, शेवटचं आलो आणि शेवटचं जाणार. पहिलं मी खंडोबाला जाणार. माझ्या पपांकडे. त्यांच्याजवळ ट्रॉफी घेऊन जाणार, आणि त्यानंतर आई मरीमाताला जाणार. इच्छा पूर्ण होऊद्या ओम नमः शिवाय. आई मरीमाता आणि पप्पा. ओम नमः शिवाय. येस जोशात. आज मी यांना नडतो. असं नडतो की मानतील बारीक आहे पण खूप बेक्कार आहे”

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5Suraj Chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update Janhvi Killekar says that Ankita walawalkar got the captaincy as a beg know more

Bigg Boss Marathi : "हिला भीक म्हणून कॅप्टन्सी दिली", जान्हवी काही सुधरेना, निक्कीनेही दिली तितकीच साथ, अंकिताला बेअक्कलही म्हणाले अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.