Bigg Boss Marathi season 5 : ‘बिग बॉस’ मराठीच घर म्हटलं की वादाची ठिणगी ही आलीच. ‘बिग बॉस मराठी’च्या मानाच्या ट्रॉफीसाठी इथं सगळे खेळ खेळताना दिसतात. सततचे वाद, भांडण, मानसिक संतुलन बिघडणे या सगळ्याच श्रेय हे ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीप्रयत्न पोहोचवतं. सगळेच जण ‘बिग बॉस’ची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. यंदाच्या पर्वातही असलेले १५ स्पर्धक ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीकडे आशेने बघताना दिसत आहेत. या पर्वातील सर्वाधिक उत्तम खेळ खेळणारा स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण. सूरज चव्हाणला संपूर्ण महाराष्ट्रातून भरभरुन कौतुक केलं जात आहे.
इतकंच नव्हे तर सूरजला प्रेक्षकांकडून, कलाकारांकडूनही भरपूर पाठिंबा मिळताना पाहायला मिळतो. आता सूरज सध्या ट्रेंडिंगमध्ये आला असून तो चर्चेत आहे. सुरुवातीच्या दिवसात सूरजला गेम कळला नव्हता त्यामुळे सूरज थोडासा घाबरायचा. त्याच नीट वागणं, बोलणं प्रेक्षकांना कळत नसेल अशी भीती त्याला वाटत होती. मात्र आता ही त्याची भीती दूर पळाली असून त्याने खेळ खेळायला सुरुवात केली आहे. आता सूरजने स्वतःचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे.
‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकावी अशी अपेक्षाही नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सूरजने बोलून दाखविली. सूरज सध्या त्याचा खेळ खेळत असून प्रेक्षकांनाही हा त्याचा खेळ आवडू लागला आहे. सूरजने नुकतीच अभिजीतकडे ट्रॉफी जिंकण्याची इच्छा बोलून दाखविली. यावेळी अभिजीतने ही सूरजची इच्छा पूर्ण व्हावी आणि आम्हाला तू ट्रॉफी जिंकलेली आवडेल असंही म्हटलं.
आणखी वाचा – Video : एकाच ताटात जेवले निक्की व डीपी, तेच पाहून बायकोचा संताप, म्हणाली, “मी तर तुम्हाला भरवते पण…”
सूरज म्हणतो, “शेवटी ट्रॉफी मीच नेणार. इथे कोणाला हात लावू देणार नाही. इथे कोण आलं शेवट, शेवटचं आलो आणि शेवटचं जाणार. पहिलं मी खंडोबाला जाणार. माझ्या पपांकडे. त्यांच्याजवळ ट्रॉफी घेऊन जाणार, आणि त्यानंतर आई मरीमाताला जाणार. इच्छा पूर्ण होऊद्या ओम नमः शिवाय. आई मरीमाता आणि पप्पा. ओम नमः शिवाय. येस जोशात. आज मी यांना नडतो. असं नडतो की मानतील बारीक आहे पण खूप बेक्कार आहे”