‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या स्पर्धकांचा खेळ पाहण्यास मजा येत आहे. नुकताच घरातील सदस्यांनी नॉमिनेशन टास्कदरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतले. या टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले. घरात पहिल्या दिवसापासून घरातील स्पर्धकांमध्ये वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकामागून एक स्पर्धक वाद घालत आहेत. निक्की-वर्षा, आर्या-जान्हवी यांची भांडणं आता काही नवीन राहिलेली नाहीत. अशातच कालच्या भागात या नॉमिनेशन टास्कवरुन घरातील सदस्यांमध्ये विचारविनिमय झाला. यावेळी घरात दोन गट पडल्याचे दिसून आले.
घरात अंकिता, धनंजय, निखिल, सूरज, पॅडी, अभिजीत, योगिता व आर्या यांचा एक ग्रुप होता तर तिकडे जान्हवी, अरबाज, घन:श्याम, वैभव, निक्की, इरीना व वर्षाताई यांचा एक ग्रुप पाहायला मिळाला. यावेळी घरातील टास्कवरुन वर्षा उसगांवकरांनी ‘बिग बॉस’कडे अंकिता वालावलकरबद्दल गॉसिप केल्याचे पाहायला मिळाले. घरी कुणी नसताना वर्षा घरातील एका कॅमेऱ्याजवळ आल्या आणि त्यांनी ‘बिग बॉस’कडे अंकिताबद्दल तक्रार केली.
यावेळी वर्षा यांनी कॅमेऱ्यासमोर असं म्हटलं की, “कॅप्टनच्या बाथरूममध्ये निक्की गेली तेव्हा अंकिता तिला बोलली की तुमच्या त्या रोमॅंटिक कपल बोलली. तरी बरं अंकिता तिला तरी बोलली म्हणून नशीब. नाही तर तिथेही तिच्याच बाजूने बोलली असती तर मला वाईट वाटलं असतं. मी काहीही बोलले तर त्याच्याकडे लक्ष दे, मी पारदर्शक भिंत असल्यासारखी माझ्याकडे का बघत असते? आणि मी संचालकाच्या टास्कदरम्यानही तिला विचारलं. कारण मला टास्क खूप उशिराने कळतात”.
‘बिग बॉस’चा शो सुरु होऊन आता १२ दिवस पूर्ण झाले असून हळहळू घरातील सदस्यांची एकमेकांबरोबर खटके उडत आहेत. त्यामुळे या घरात कुणाचा निभाव लागणार? कॉन कुणावर किती भारी पडणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या कालच्या भागात टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसले. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसले. त्यामुळे कालचा भाग खूपच रंजक झाला