कलाकार जेवढा प्रसिद्ध तेवढाच त्याचा चाहता वर्ग ही वेगाने वाढत जातो. कधी कधी चाहत्यांचं प्रेम इतकं कि २४ तास आपल्या आवडत्या कलाकाराच्या घराखाली कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी थांबतात उदाहरणार्थ बॉलीवूड किंग खान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शाहरुख खानचं उदाहरण घ्या. कधी कधी चाहत्यांच्या गर्दीमुळे कलाकारांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत. असच काहीस घडलेलं मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांच्या सोबत. महाराष्ट्र ज्यांना लाडाने अशोक मामा म्हणून ओळखतो त्याचं मामाचं पाकीट एकेदिवशी चाहत्यांच्या गर्दीत मारलं गेलं. त्याबद्दलचा किस्सा नक्की काय आहे जाणून घेऊयात.(Ashok Saraf Wallet Stolen)
अशोक मामांचा ‘पांडोबा पोरगी फसली’ चा प्रीमिअर पुण्याच्या विजय टॉकीज मध्ये ठेवण्यात आला होता. अशोक सराफ यांच्या सह अन्य कलाकार देखील चित्रपट पाहण्यासाठी आले. चित्रपट संपला पण काही कारणास्तव मामांना बाहेर येण्यास उशीर झाला तो पर्यंत इतर कलाकार तिथून निघून गेले होते.

सवयीप्रमाणे अशोक मामा शिट्टी वाजवत बाहेर पडू लागले पण बाहेर पडताच त्यांनी जे काही पाहिलं ते पाहून थक्क झाले. असंख्य लोक अशोक सराफ यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी जमले होते. ही गर्दी पाहून अशोक सराफ त्यांच्या मित्राला म्हणाले आपला चित्रपट लोकांना आवडलेला दिसतोय गर्दी किती आहे बघ त्यावर बाजूला उभा असलेला थिएटर मॅनेजर अशोक सराफ यांना म्हणाला अहो ही गर्दी चित्रपटासाठी नाही तर तुमच्यासाठी आहे.
आणि असं हे सगळं घडलं…(Ashok Saraf Wallet Stolen)
अशोक सराफ यांना मात्र आता इथून बाहेर पडायचं कस हा मोठा प्रश्न पडला होता. त्या जमलेल्या गर्दीतून बाहेर पाडण्यासाठी मामांनी शक्कल लढवली त्यांच्या मित्राला ते म्हणाले तू पुढेचाल मागून मी येतो आणि ते दोघे गर्दीत उतरले पण आजूबाजूच्या गर्दीततून कस बस बाहेर पडल्यानंतर अशोक मामानं जाणवलं कि त्यांचं पाकीट कोणी तरी मारलंय पुढे त्यांनी सांगितलं ज्याने एवढ्या गर्दीत माझं पाकीट मारलं त्याला कदाचित हे माहिती नसावं कि त्याने जे चोरलंय ते पाकीट न्हवत तर माझी छोटी डायरी होती.
हे देखील वाचा – ‘म्हणून रिअल लाईफ धडाकेबाज होता लक्ष्या…’फायरिंगचा सिन पण हातातच झाला गोळीचा स्फोट, रक्तबंबाळ हाताने दिला परफेक्ट शॉट
गर्दीतून कसबसं सावरत अशोक सराफ आहे त्यांचे मित्र बाहेर पडून रिक्षात बसले. पण कशाचं काय इथे ही घडलं भलतंच लोकांनी त्या रिक्षाला गराडा घातला आणि रिक्षा वाल्याने अशोक मामांकडे तोंड करून विचारलं कि तुम्हीच सांगा आता कास पुढे जाऊ. कशी बशी वाट काढत ते बाहेर पडले आणि चाहत्यांचा प्रेम पाहून अशोक सराफ यांना असाही एक अनुभव मिळाला.(Ashok Saraf Wallet Stolen)