Akshay Kumar at haji ali dargah : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. खिलाडी अक्षय कुमार म्हणूनही त्याची एक वेगळी ओळख आहे. सध्या तो त्याच्या आगामी चित्रपटामुळे अधिक चर्चेत आला आहे. ‘खेल खेल मे’ या चित्रपटात तो महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. मात्र सध्या तो अभिनय नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अधिक कमाई करण्याबरोबरच तो दानधर्म करण्यासाठी अग्रेसर असतो. तो अनेकदा संस्था, धार्मिक स्थळ अशा ठिकाणीही तो दान देताना दिसत असतो.
अक्षय नुकताच मुंबई येथील हाजी अली दर्ग्यात पोहोचला होता. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर वहीरल झाले होते. इतकेच नाही तर दर्ग्याच्या नूतणीकरणासाठी त्याने १.२१ कोटी रुपये दानही केले आहे. सध्या हाजी आली दर्ग्याचे नूतणीकरण सुरु आहे. त्याने केलेल्या दानामुळे सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. तेथील लोकांनी त्याचे स्वागत केले तसेच अक्षयने तिथे जाऊन दर्ग्यावर चादरदेखील चढवली.
याआधीही अक्षयने बऱ्याच ठिकाणी दान केले आहे. राम मंदिराच्या निर्मितीवेळी अक्षयने ३ कोटी रुपयांची देणगी दिली होती. मात्र जिर्णोद्धाराच्या वेळी अक्षय ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने आयोध्येमध्ये उपस्थित राहू शकला नाही. आता त्याचा नवीन चित्रपट ‘खेल खेल मे’ १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून तो प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर तापसी पन्नू, वाणी कपूर, फरदीन खान, आदित्य सिल, एमी विर्क हे कलकार दिसणार आहेत.
१९८७ साली त्याने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले. ‘मोहरा’, ‘मै खिलाडी तू अनाडी’, ‘जानी दुश्मन’, ‘गरम मसाला’, ‘फिर हेरा फेरी’, ‘हमको दिवना कर गये’, ‘भागम भाग’, ‘वेलकम’, ‘भूलभुलय्या’, ‘हे बेबी’, ‘सिंह इज किंग’, ‘हॉलिडे’, ‘पॅडमॅन’ व ‘सूर्यवंशी’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केले आहे. आता तो ‘स्काय फोर्स’, ‘कनप्पा’, ‘जॉली एलएलबी ३, ‘वेलकम टू द जंगल’, ‘शंकरा’ व ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.