पड्द्यासोमर येऊन कलाकार प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत असतात.अनेक भूमिकांमधून ते प्रेक्षकांच्या समोर येतात. चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये प्रत्येक नवीन प्रोजेक्ट मध्ये ते वेगेवगेळ्या व्यक्तींसोबत जोडी म्हणून काम करत असतात. आणि या प्रत्येक जोडीला प्रेक्षक तितकंच प्रेम देतात.परंतु या प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांचे खरे जीवन साथी त्यांच्यासाठी खूप खास असतात. (Kushal Badrike Sunayana Badrike)
असेच कॉमेडीचं पॅकेज असणारा अभिनेता कुशल बद्रिके. चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून कुशल घराघरात पोहोचला. वेगवेगळ्या रूपात पाहायला मिळाला. छोट्या पडद्याप्रमाणे कुशलने मोठ्या पडद्यावर ही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. जत्रा, बकुळा नामदेव घोटाळे, भाऊचा धक्का असे चित्रपट देखील त्याने केले आहेत.

पाहा काय आहे कुशलची खास पोस्ट ? (Kushal Badrike Sunayana Badrike)
कोणत्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असे मानणारे बरेच कलाकार आहेत. कुशलने त्याच्या एनिवर्सरी निम्मित बायको सोबतचा खास फोटो शेअर केला आहे.या फोटोला त्याने विशेष असं कॅप्शन दिल आहे. त्यात त्याने म्हंटल आहे, मला चहा खूप आवडतो, आणि मी तो पितो ही खूप. म्हणूनच कदाचित आपल्या लग्नाआधी काही नातेवाईक, माझ्या बदल तुला म्हणाले होते, he is not your cup of tea तरीही चहाच्या टपरीवरच्या भेटीपासून, ते लग्नाच्या गाठीपर्यंतचा,आपला प्रवास झाला. तू लक्ष्मीच्या पावलांनी भाड्याच्या खोलीत आलीस.आणि नटराजच्या पावलांनी स्वतः च्या घरात नाचू लागलीस.आता आपल्या घरात चहापाण्याला आलेल्या नातेवाईकांसोबत तू बसतेस आणि बऱ्याचदा त्यांना कॉफी पाजतेस. बहुतेक तुला ही पटलंय, i am not your cup of tea, i am your cappuchino बघ, संपल्यावरही रेंगाळून राहीन चवीसारखा तुझा आयुष्यात एक गोड आठवण बनून हैप्पी एनिवर्सरी यार. (Kushal Badrike Sunayana Badrike)

त्याच्या या फोटोवर अनेक कलाकार मित्रांनी त्याला एनिवर्सरी च्या शुभेच्छा दिल्या आहेत परंतु त्यात ही अभिनेता संतोष जुवेकर ची कमेंट लक्ष वेधून घेणारी आहे. त्यात त्याने म्हंटल आहे, चल घरी तुला बघते,असं काहीसतीच हसन, आणि तू हो हो चालेल .. पण मी नेमकी काय माती खाली हे आठवण्यात तुझं वाह्यात गेले हसन i love this duo आपली फुलणारी प्रेमकहाणी जवळून बघणारा एक तरी मित्र प्रत्येकाच्या आयुष्यत असतो.
हे देखील वाचा : अशोक मामा-लक्ष्मीकांत बेर्डेनंतर कुशल बद्रिके-भाऊ कदम…