शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सारं काही तिच्यासाठी’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची लगीनघाई सुरु, केळवणाला सुरुवात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 7, 2024 | 3:56 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Abhishek Gaonkar and sonalee gurav first kelvan

अभिनेता अभिषेक गांवकर व रील स्टार सोनाली कुलकर्णीच्या पहिल्या केळवणाचे फोटो व्हायरल

मराठी सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रेमाची कबुली देत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं. या कलाकारांमध्ये ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता अभिषेक गांवकर याचही नाव आवर्जून घेतलं जाईल. अभिषेकने यंदाच्या गुढीपाडव्याचे औचित्य साधत साखरपुडा केला असल्याचं समोर आलं. साखरपुडा केला असल्याचं सांगत अभिनेता अभिषेक गावकर याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. अभिषेकने रील स्टार सोनाली गुरवसह जाहीर प्रेमाची कबुली दिली. (Abhishek Gaonkar first kelvan)

अभिनेता अभिषेक गावकर व सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरव यांचा साखरपुडा पडल्यानंतर हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच अभिषेक – सोनालीचं पहिलं केळवण पार पडलं. अभिषेक व सोनाली अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यांनी सोशल मीडियावर देखील अनेक फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाबाबत अपडेट चाहत्यांसह शेअर केली होती. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोनाली व अभिषेकने साखरपुडा केल्यानंतर आता त्यांच्या केळवणाची तयारी सुरु झाली आहे.

आणखी वाचा – “प्रेम, विश्वास काही नसतं…”, दुसऱ्यांदा लग्न मोडल्यानंतर दलजीत कौरची वाईट अवस्था, म्हणाली, “मी आता…”

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

सोनाली व अभिषेक लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नापुर्वीच्या कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे. त्यांच्या पहिल्या केळवणाचे फोटो ही समोर आले आहेत. सोनाली-अभिषेकचं पहिलं केळवण रेस्टॉरंटमध्ये करण्यात आलं असल्याचं दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये सोनाली व अभिषेक एकमेकांना केक भरवताना दिसत आहेत. सोनाली व अभिषेकच्या केळवणाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “DP दादा तो रडण्याची नाटकी करतोय”, छोटा पुढारी धनंजय पोवारकडे रडल्यानंतर प्रेक्षकांनी चांगलंच सुनावलं, म्हणाले, “आधी कमी लेखलं…”

सोशल मीडियावरही अभिषेकचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. अभिषेकची गर्लफ्रेंड सोनाली ही कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत आहे. भरपूर फॉलोवर्स असलेल्या सोनालीचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. विविध विषय रीलद्वारे मांडत ती नेहमीच चहात्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या व्हिडीओलाही मिलियन व्ह्यूज मिळालेले पाहायला मिळाले. सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटरमध्ये सोनालीचं नाव आवर्जून घेतलं जात. आता ही जोडी केव्हा लग्नबंधनात अडकणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Swara Bhaskar on Vinesh Phogat

Paris Olympics 2024 : विनेश फोगाट अपात्रता प्रकरणावर स्वरा भास्करची सणसणीत टिका, म्हणाली, “कोणाकोणाला विश्वास…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.