शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “DP दादा तो रडण्याची नाटकी करतोय”, छोटा पुढारी धनंजय पोवारकडे रडल्यानंतर प्रेक्षकांनी चांगलंच सुनावलं, म्हणाले, “आधी कमी लेखलं…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 7, 2024 | 2:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Dhananjay Powar supported Ghan:Shyam Darwade, netizens praised DP Dada, and said Chota Padari tears is fake.

छोटा पुढारी घनश्यामचं रडणं प्रेक्षकांना वाटलं फेक, नाटकं करतोय म्हणत केली टीका

Bigg Boss Marathi Update : “DP दादा तो रडण्याची नाटकी करतोय”, छोटा पुढारी धनंजय पोवारकडे रडल्यानंतर प्रेक्षकांनी चांगलंच सुनावलं, म्हणाले, “आधी कमी लेखलं…”‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून गेले काही दिवस घरात या ना त्या कारणांनी सतत  वाद, भांडण, राडे, आरडाओरडा पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’ सुरु होऊन दहा दिवस पूर्ण झाले असून प्रत्येक दिवशी कुणी कुणावर तरी ओरडतच होतं. प्रत्येक दिवशी काहीना काही कारणांवरुन वाद होत होते. या वाद व भांडणांदरम्यान छोटा पुढारीचा एक प्रोमो समोर आला आहे. जो खूपच हळवा व भावुक आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात काल पहिलं कॅप्टनसीचं कार्य पार पडलं. यावेळी गेम अनफेअर झाला त्यामुळे घन:श्यामला रडू कोसळले. छोटा पुढारी’ म्हणजेच घन:श्याम दरवडेने धनंजय पोवारकडे त्याच्या भावना व्यक्त केल्या. एकीकडे नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव आणि जान्हवी यांचा राग अनावर होतो. (Bigg Boss Marathi 5 netizens said Chota Padari tears is fake)

यामुळे गेम अनफेअर झाला म्हणून घन:श्याम ओक्साबोक्शी रडू लागतो. याचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये ‘छोटा पुढारी’ धनंजयकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना दिसून येत आहे. टास्कमध्ये हरल्याने घन:श्यामला खूप वाईट वाटतं आणि तो रडू लागतो. यावेळेस घन:श्याम धनंजयकडे असं म्हणतो की, “माझ्या घरच्यांना म्हणायचंय तुमचा मुलगा काही करू शकत नाही आहे. उंची नाही त्यामुळे लोकंही म्हणतात यांचा मुलगा ‘बिग बॉस’मध्ये कसा गेला?”. याच प्रोमोवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या प्रतिक्रियांमधून नेटकऱ्यांनी धनंजयलं पाठींबा दिला असून त्याचे कौतुक केलं आहे. मात्र घन:श्यावर अनेकांनी टीका केली आहे. त्याचं वागणं दुटप्पी असल्याचेही म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : छोटा पुढारीला कोसळलं रडू, शेवटी धनंजय पोवारनेच दिली साथ, म्हणाला, “माझ्या घरच्यांना…”

या व्हिडीओखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “घनश्यामने कायम धनंजय दादाला कमी लेखलं, कायम धनंजय दादाच्या विरोधात बोलला आणि आता त्यांच्याच जवळ जाऊन मन मोकळं करत आहे, रडत आहे.” तर आणखी एकाने “नॉमिनेशन मधे आलाय म्हणून नाटक सुरू आहे” असं म्हटलं आहे. तसंच एका नेटकऱ्याने “तुझ्यासाठी सहानुभूती आहे नक्कीच…पण कधी कधी तुझ रडणे पण खोटं आहे असं वाटतं. काल अरबाजकडे रडत होता…आता डिपीदादा कडे रडत आहेस” असं म्हटलं आहे”. तसंच “हा असाच रडतो सगळ्यांकडे जाऊन आणि नंतर त्यांच्याच विरोधात बोलतो डबल ढोलकी”, “याला त्याची टीम बदलायची आहे म्हणून हा नाटक करतं आहे” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi :  लायकी, लाज काढली अन्…; निक्कीच्या पावलांवर पाऊल ठेवतेय जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगांवकरांचा अपमान, नक्की चुक कोणाची?

याचदरम्यान, डिपीने घन:श्यामला समजावल्यामुळे त्याच्या अनेक चाहत्यांनी डिपीचे कौतुक केलं आहे. “माणुसकीच दुसरं नाव म्हणजे कोल्हापूर आणि अश्या कोल्हापूरचे आमचे डिपीदादा सगळ्यांना समजून घेतात”,”डिपी दादा एक प्रेमळ व्यक्तिमत्त्व आहे”, “डिपी दादा तुमचा अभिमान आहे”, “डिपी दादा दिलदार माणूस”, “याच स्वभावामुळे डिपी दादा आम्ही तुम्हाला विजेता म्हणून पाहतो” अशा अनेक कमेंट्स करत डिपी म्हणजेच धनंजयचे कौतुक केलं आहे.

Tags: bigg boss marathi 5dhananjay powarGhanshyam Darwade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada serial update new twist Adhipati mother Charulata will meet with Akshara

Tula Shikvin Changlach Dhada : अधिपतीची जन्मदात्री आई चारुलताची मालिकेत एन्ट्री, भूवनेश्वरीच घेऊन आली नवं रुप, अक्षराशी भेट घडताच…; मोठा ट्वीस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.