रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi :  कोकणची चेडवा हो नाखवा!, ‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वाची पहिली कॅप्टन ठरली अंकिता वालावलकर, गेम चेंज होणार

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 7, 2024 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 Konkan Hearted Girl Ankita Valawalkar become the first captain of the season

Bigg Boss Marathi 5 च्या पहिल्या कॅप्टन पदी ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर विराजमान

Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी ५’ ला सुरुवात झाली असून या शोला  दहा दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळवारी ‘बिग बॉस मराठी’चा १०वा एपिसोड प्रसारित झाला. या खेळातील अंकिता प्रभू वालावलकर हिने बिग बॉसचा टास्क सर्वांना वाचून दाखवला. या कार्यासाठी वर्षा उसगांवकर यांना संचालक म्हणून नेमण्यात आले, शिवाय त्यादेखील या कार्यात सहभागी होतात. या घरात पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला आणि यात अंकिता वालावालकर ही घराची पाहिली कॅप्टन झाली. कॅप्टन्सी टास्कचं नाव ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं होतं. मात्र या टास्कमुळे घरातील स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली. एकीकडे नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव आणि जान्हवी यांचा राग अनावर होतो. (Bigg Boss Marathi 5 Ankita Valawalkar captain)

या कार्यासाठी वर्षा उसगांवकर यांना संचालक म्हणून नेमण्यात आले, शिवाय त्यादेखील या कार्यात सहभागी होतात. योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर आणि निखिल या आठवड्यात कॅप्टन होणार नाही, हे ‘भाऊच्या धक्क्या’वर ठरले होते. या टास्क दरम्यान मोटरमनच्या केबिनमधील सीटवर जो बसेल तो कॅप्टन पदाचा उमेदवार ठरवणार असतो. मोटरमनसाठी दोन जागा असतात. त्याशिवाय, ट्रेनमध्ये हिरवी व लाल मार्गिका असे दोन भाग केले असतात. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या आदेशानंतर ट्रेन कोणत्या मार्गिकेवर धावणार हे ठरते. त्या मार्गिकेवर जे स्पर्धक बसले आहेत, त्यांच्यातील एक सदस्य कॅप्टनपदासाठी पात्र ठरणार असतो.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : छोटा पुढारीला कोसळलं रडू, शेवटी धनंजय पोवारनेच दिली साथ, म्हणाला, “माझ्या घरच्यांना…”

कॅप्टनपदाचा उमेदवार ठरवण्याची महत्त्वाची जबाबदारी मोटरमनवर असल्याने ती खुर्ची पटकावण्यासाठी दोन्ही ग्रुपमध्ये जोरदार राडा होता. वैभव-सूरज, आर्या-जान्हवी यांच्यात वादावादी होते. संचालक असलेल्या वर्षा उसगांवकर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत अरबाज संताप व्यक्त करतो. तिसऱ्या फेरीत बिग बॉस या टास्कमध्ये ट्विस्ट आणतात आणि हिरवी मार्गिका बंद करतात. त्यामुळे केवळ निळ्या मार्गिकेसाठी लढत होते. हॉर्न वाजल्यानंतर वैभव व योगितामध्ये सीटवर बसण्यावरुन चढाओढ होते. दोघेही मोटरमनच्या सीटवर आपला दावा सांगतात. योगिता अक्षरश: रडते पण आपली जागा सोडत नाही. त्यामुळे अखेर संचालिका वर्षा उसगांवकर या योगिताही मोटरमनच्या सीटवर बसली असल्याचे सांगतात. 

आणखी वाचा – Bigg Boss Marathi :  “या शेंबड्या अरबाजसाठी…” अरबाजच्या वागणूक व अरेरावीवर भडकला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “नंतर भीक मागत…”

या टास्कमध्ये योगिता ज्या एका प्रवाशाला बुलेट ट्रेनमध्ये ठेवणार, त्याचे नाव कॅप्टन म्हणून जाहीर होणार असते. मात्र, योगिता ही पॅडी, निक्की, अभिजीत, वैभव यांना बाद करते आणि अंकिताची कॅप्टन म्हणून निवड करते. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाची पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान अंकिताला मिळतो. अंकिता कॅप्टन झाल्यावर डिपी दादा अंकिताला उचलून कॅप्टनच्या खोलीत नेतो. त्या ठिकाणी यंदाच्या सीझनमधील कॅप्टनसाठी अभिजित व इतर सदस्य गाणं गातात. मात्र, यात निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव हा ग्रुप सहभागी झालेला नसतो.

Tags: ankita walawalkarbigg boss marathi 5Bigg Boss Marathi 5 new captain
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Saorabh Choughule On bigg boss marathi season 5

"लायकी, भीक व घाणरेडी…", Bigg Boss Marathi मध्ये सुरु असलेल्या भांडणावरुन योगिता चव्हाणचा नवरा भडकला, म्हणाला, "कुटुंबाबरोबर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.