शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

श्रद्धा कपूरचं बॉयफ्रेंडसह ब्रेकअप, थेट संबंधचं तोडले कारण…; काय बिनसलं?   

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 5, 2024 | 5:58 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shraddha Kapoor breakup with her boyfriend Rahul Modi

श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीबरोबर ब्रेकअप, चर्चांना उधाण

अभिनय कौशल्य, सुंदर आवाज, सौंदर्य आणि तितकीच सुशील अशी ओळख असलेली बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूरचा साधेपणा आणि गोड स्वभाव चाहत्यांच्या कायम पसंतीस उतरतो. आपल्या सुंदर दिसण्याने व क्युट स्वभावामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कपूरशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. ते म्हणजे तिचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. श्रद्धाने कथित प्रियकर राहुल मोदीबरोबरचे सर्व संबंध तोडल्याचा दावा केला जात आहे. (Shraddha Kapoor breakup)

राहुलच्या कुटुंबापासूनही अंतर राखले आहे. याबद्दल अद्याप काहीही अधिकृतपणे समोर आलेले नाही, परंतु अचानक श्रद्धाने राहुल मोदीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. अभिनेत्रीने केवळ राहुलच नाही तर त्याची बहीण, प्रॉडक्शन हाऊस आणि त्याच्या कुत्र्याचे अकाऊंटही अनफॉलो केले असल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने राहुल मोदींबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. श्रद्धाच्या त्या इंस्टाग्राम स्टोरीवरून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा झाल्या होत्या.

View this post on Instagram

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

आणखी वाचा – “लॉकडाउनमध्ये माझा घटस्फोट झाला आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मोठा खुलासा, एकट्याने करते मुलाचा सांभाळ

श्रद्धाने काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा राहुलबरोबरचा सेल्फी फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तुझं मन तुझ्याकडे ठेवलं तर चालेल. पण मला माझी झोप परत कर मित्रा.” तसंच याआधी श्रद्धाने तिच्या गळ्यात आर अक्षर असलेले लॉकेटदेखील घातल्याचा फोटोही शेअर केला होता. त्यामुळे या दोघांच्या नात्याविषयी अनेक चर्चा झाल्या होत्या. अशातच आता त्यांच्या नात्यात दुरावा असल्याचे म्हटलं जात आहे.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकारांचा पिकनिकमध्ये धमाल बाल्या डान्स, पारंपरिक नृत्य पाहून प्रेक्षकांकडून कौतुक

दरम्यान, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘तू झूठी मैं मकर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला राहुल मोदी व्यवसायाने लेखक आहे. श्रद्धाबरोबर त्याची पहिली भेट ‘तू झुठी मैं मक्कर’च्या सेटवर झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या वर्षी मार्चमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये श्रद्धा आणि राहुल एकत्र दिसले होते.

Tags: shraddha kapoorShraddha Kapoor Rahul ModyShraddha Kapoor Rahul Mody Breakup
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Updates new promo nikki tamboli and jahnavi killedar fight

Bigg Boss Marathi : आधी निक्की तांबोळीच्या खांद्याला खांदा लावून राडे, आता तिच्यावरच पलटली जान्हवी किल्लेकर, मैत्रीत मोठी फूट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.