शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१२ ज्योतिर्लिंगांची यात्रा करत आहे प्राजक्ता माळी, नाशिकला पोहोचली अभिनेत्री, म्हणाली, “महादेवांकडे प्रार्थना आहे की…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 5, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Prajakta Mali visited Shankara at Trimbakeshwar in nashik

श्रावणी सोमवारच्या दिवशी प्राजक्ता माळीने केला खास निश्चय, जाणून घ्या...

आज ५ ऑगस्ट २०२४ पासून महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये श्रावण महिना सुरू झाला आहे. आज पहिला श्रावण सोमवार आहे. भगवान शंकराची आराधना आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी श्रावण महिना हा सर्वोत्तम काळ मानला जातो. या पवित्र महिन्यात भगवान शंकराची आराधना केल्याने भोलेनाथ लवकरच प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात अशी भक्तांची मान्यता आहे. सामान्य भक्तांप्रमाणे मराठी कलाविश्वतीलही अनेक कलाकार मंडळींनी आजच्या श्रावण सोमवारनिमित्त खास पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या श्रावण महिन्यानिमित्त कलाकारांनी पोस्ट शेअर करत श्रावण महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळी.  (Prajkta Mali on Instagram)

प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती सोशल मीडियाद्वारे आध्यात्मिक पोस्टही शेअर करत असते. प्राजक्ता जितकी बोल्ड, विचारी, सुसंस्कारी आहे तितकीच ती शिवभक्त आहे. महादेवावर विश्वास ठेवून त्याची पूजा अर्चा करण्यात ती कायमच तल्लीन असते.  अशातच तिने आजच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त खास फोटो शेअर केला आहे. तसेच या पोस्टद्वारे तिने एक निश्चय केल्याचेही सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “पॅडी ‘बिग बॉस’च्या घरात गेलाच का?”, प्रश्न विचारताच अभिनेत्याच्या खास मैत्रिणीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली, “त्याच्या नशिबात…”

प्राजक्ताने नुकतीच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या भगवान शंकरांच्या मंदिराला भेट दिली. याच मंदिरातील काही खास फोटो प्राजक्ताने आजच्या पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त शेअर केले आहेत. हेचं फोटो शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “दुसरं ज्योतिर्लिंग दर्शन पुर्ण. आज श्रावण मासारंभ… पुढची यात्रा लवकर पुर्ण व्हावी हेच “देवादी देव – महादेवांकडे” प्रार्थना” प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असून मंदीराच्या गाभाऱ्यातील व मंदीराबाहेरील खास फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम कलाकारांचा पिकनिकमध्ये धमाल बाल्या डान्स, पारंपरिक नृत्य पाहून प्रेक्षकांकडून कौतुक

तिच्या या फोटोला चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. चाहत्यांनी या  फोटोखाली “ॐ नमः शिवाय, प्राजु तुझी इच्छा नक्की पुर्ण होवो हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम्” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कृतीचे कौतुक केले आहे. प्राजक्ता नेहमीच तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. अशातच तिची ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Tags: marathi actressMarathi newsprajakta mali
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
Next Post
06 august 2024 Saturday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

06 August Horoscope : मेष, वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस आहे खास, धनलाभाचे आहेत योग, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.