शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi मध्ये महाराजांचा जयजयकार होताच अरबाजच्या तोंडून एकही शब्द नाही, प्रेक्षक म्हणाले, “लायकी नाही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 5, 2024 | 12:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss marathi season 5 fame arbaj patel troll

'बिग बॉस मराठी' सिझन ५मध्ये महाराजांचा, संतांचा अपमान करताच अरबाज पटेल ट्रोल

Bigg Boss Marathi Update :  ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाने साऱ्यांना वेड लावलं आहे. सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यंदाच्या या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहे. अगदी रंगतदार खेळ सुरु असताना ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने चुकी असलेल्या सर्व स्पर्धकांची चांगलीच कानउघडणी केलेली पाहायला मिळाली. या पर्वात नुकत्याच झालेल्या एलिमनेशन राउंडमध्ये या पर्वात पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांमध्ये अंकिता वालावलकर, धनंजय पवार, सुरज चव्हाण, वर्षा उसगावकर, पुरुषोत्तम दादा पाटील आणि योगिता चव्हाण हे स्पर्धक होते. प्रेक्षकांनी दिलेल्या वोटिंगनुसार यंदाच्या पर्वातील घराबाहेर पडणारा पहिला स्पर्धक म्हणजेच पुरुषोत्तम दादा पाटील आहे.

या पर्वातील पुरुषोत्तमदादा पाटील यांचा प्रवास संपला असून त्यांना घराबाहेर पडावे लागले आहे. घराबाहेर पडताना पुरुषोत्तम दादा पाटील यांना निरोप देताना सर्व स्पर्धक भावुक झाले. पेशाने कीर्तनकार असलेल्या पुरुषोत्तम दादा पाटील या स्पर्धकाने घराबाहेर पडतानाही संतांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार केला आणि जाता जाता त्यानं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली. हा जय जयकार सर्व स्पर्धक करताना दिसले मात्र यावेळी अरबाज पटेल हा जयजयकार ऐकून अगदी स्तब्ध उभा होता. त्याच्या तोंडून एकही अक्षर फुटलं नाही हे पाहून प्रेक्षकांनी त्याला चांगलंच ट्रोल केलेलं पाहायला मिळालं.

आणखी वाचा – Paaru Marathi Serial : अनेक अडथळ्यातून पारू व अहिल्यादेवींचं व्रत पुर्ण, आतातरी आदित्यचा जीव वाचणार का?

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘कलर्स मराठी वाहिनी’च्या पेजवरुन पुरुषोत्तम दादा पाटील यांना निरोप देण्यात आला. या पोस्टखाली अनेकांनी कमेंट करत अरबाजच्या वागणुकीवर आक्षेप घेतला. नेटकऱ्यांनी यावर कमेंट करत अरबाजला ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. “परत जाताना माऊली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलले तेव्हा हा अरबाज गप्प उभा होता, तरी हा Big Boss मराठी मध्ये कसा?”, “जेव्हा माऊली संतांचा जयजयकार करत होते तेव्हा अरबाज पटेलच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही”, “गेल्या चार सीझनमध्ये कोणीही हे करु शकले नाही. आज पुरुषोत्तम दादांनी करुन दाखवलं. माझ्या स्वराज्याच्या राजाचं आणी धाकल्या धन्याच, संतांचं नाव बिग बॉसच्या घरात दुमदुमलं. खरंच खूप आभार महाराज. इथे सुद्धा धर्माचा तिरस्कार पाहायला मिळाला पण ज्या व्यक्तीने केला त्यालाही लवकरच बाहेर काढू”, असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आधी प्रेमाचं नाटक, आता निक्की तांबोळी व अरबाजमध्ये फाटाफूट, तिच्यावर आवाज चढवून बोलताच…

तर आणखी काही नेटकऱ्यांनी, “अरे या अरबला कशाला घेतलं. ज्याच्या तोंडातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जय येऊ शकत नाही ते महाराष्ट्र काय देशात राहायच्या लायकीचे नाही. त्याच्या तोंडावर बघितलं तर महाराजांचे नावे घेतल्यावर बारा वाजले होते. तो जय नाही म्हणाला तरी काही फरक पडत नाही. महाराजांची उंची खूप मोठी आहे”, अशा कठोर शब्दात त्याला चांगलंच ट्रोल केलं आहे.

Tags: arbaj patel trollbigg boss marathiBigg Boss Marathi Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
bigg boss marathi season 5 vishakha subhedar support paddy kamble

"तिथे शांत बसू नकोस", पॅडीसाठी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, "तुझ्या माणसांच्या मदतीसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.