शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्रीला बॉयफ्रेंडनेच फसवलं, दुसऱ्याच मुलीबरोबर पकडलं अन्…; म्हणाली, “माझ्या आयुष्यामध्ये…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 2, 2024 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mahima Chaudhary talked on her relationship with tennis player Leander Paes

महिमा चौधरी व लिएंडर पेस यांच्या नात्यात नक्की काय झालं होतं? अभिनेत्रीनेच केला खुलासा

Bollywood actress Mahima Chaudhary : बॉलिवूड अभिनेत्री महिला चौधरी आता मनोरंजन क्षेत्रात फारशी कार्यरत नसली तरी तिचे वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच चर्चेत असते. ५० वर्षांची महिमा एकाकी जीवन जगत आहे. ती एका मुलीची आई आहे. तिने आयुष्यात खूप दु:ख सोसले आहे. प्रेम, विश्वासघात आणि घटस्फोट याशिवाय तिला कॅन्सरसारख्या घातक आजारानेही ग्रासले आहे. उद्योगपती बॉबी मुखर्जीबरोबर लग्न करण्याआधी महिमाने टेनिसपटू लिएंडर पेसबरोबर रिलेशनमध्ये होती. मात्र, पेसकडून तिची फसवणूक झाल्यामुळे ती त्याच्याबरोबर स्थिरावू शकली नाही. महिमा चौधरीने सुभाष घई यांच्या ‘परदेस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा चाहतावर्ग हा प्रचंड मोठा आहे. पण ती अधिक चर्चेत आली लिएंडर पेसबरोबरच्या नातेसंबंधामुळे.(Mahima Chaudhary on her relationship)

महिमा व लिएंडर जवळजवळ ३ वर्षे एकमेकांना डेट करत होते आणि महिमा नेहमीच टेनिसपटूच्या कायम पाठीशी उभी राहिली. पेस जेव्हा त्याचे सामने खेळत असे तेव्हा ती नेहमी स्टेडियममध्ये दिसायची. मात्र, नंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि अभिनेत्रीने ब्रेकअपचे कारण मॉडेल रिया पिल्लईबरोबरचे त्याचे अफेअर असल्याचे सांगितले. ‘मिस मालिनी’ला दिलेल्या मुलाखतीत महिमाने तिच्या पूर्वीच्या नात्याबद्दल भाष्य केलं. यावेळी ती असं म्हणाली की, “तो (लिएंडर पेस) एक चांगला टेनिसपटू असू शकतो, पण तो माझ्याशी चांगला वागला नाही. जेव्हा मला कळले की, तो कोणत्या दुसऱ्या मुलीबरोबर आहे, तेव्हा मला काही धक्का बसला नाही. त्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यावर काहीही परिणाम झाला नाही. मी स्वतःवर नियंत्रण ठेवले. त्यामुळे मी बलवान झाले”.

View this post on Instagram

A post shared by Mahimachaudhry (@mahimachaudhry1)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : “माकडचाळे व खोटं वागणारे…”, सूरज, धनंजय व घन:श्यामसाठी मराठी अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, “सभ्य-असभ्यता…”

पेसला रियाविरुद्ध घरगुती हिंसाचारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. रियाने २०१४ मध्ये लिएंडर पेसविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. कोर्टाचा निर्णय टेनिसपटू लिएंडर पेसच्या विरोधात गेला आहे. त्यामुळे न्यायालयाने रियाला दरमहा १.५० लाख रुपये भत्ता देण्याचे आदेश दिले. पेसला रियाबरोबरचे आपले घर सोडायचे असेल तर त्याला मासिक भाडे ५०,००० रुपये द्यावे लागतील, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : चक्क भांडी घासायचा कोकण हार्टेड गर्लला ट्रॉमा, ढसाढसा रडलीही अन्…; कसा निभाव लागणार?

दरम्यान,  लिएंडर पेसपासून वेगळे झाल्यानंतर महिमाने २००६ मध्ये उद्योगपती बॉबी मुखर्जीबरोबर लग्न केले. पण २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव एरियाना आहे. महिमाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर महिमा लवकरच कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Tags: bollywood actressBollywood entertainment newsmahima chaudhary
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
akshay kumar look

सलग फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारची झाली आहे अशी अवस्था, पांढरी दाढी अन् बदलता लूक पाहून सगळेच अवाक् कारण…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.