शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सूरज चव्हाणची एका दिवसाची कमाई ऐकून सेलिब्रिटींनाही धक्का, कमावतो तब्बल…; म्हणाला, “आधी मला खूप लोकांनी लुटलं अन्…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 30, 2024 | 12:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Suraj Chavan Income

सूरज चव्हाणची एका दिवसाची कमाई ऐकून सेलिब्रिटींनाही धक्का, कमावतो तब्बल...; म्हणाला, "आधी मला खूप लोकांनी लुटलं अन्..."

‘बिग बॉस मराठी’चा नवा पर्व सुरु झाला तेव्हापासून सर्वत्र या शोची चर्चा सुरु झाली आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम जम बसवू पाहत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातील १६ स्पर्धक हे एकापेक्षा एक असलेले पाहायला मिळत आहेत. सर्वत्र ‘बिग बॉस’ची चर्चा सुरु आहे. अशातच यंदा ‘बिग बॉस’मध्ये अभिनेता नव्हे तर अनेक रील स्टार, कीर्तनकार, मॉडेल यांनाही संधी मिळाली आहे. यंदाच्या पर्वात रील स्टार सुरज चव्हाण स्पर्धक म्हणून पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असलेला सूरज चव्हाणने टिक टॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवरील रील्सवर आपल्या खास शैलीतील व्हिडीओने धुमाकूळ घातला. (Suraj Chavan Income)

‘गुलिकत धोका’ असे खास आपल्या शैलीत बोलणारा सूरज हा सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. विनोदी धाटणीच्या व्हिडीओने सूरजच्या रील्सला चांगलाच प्रतिसाद मिळतो. मोबाईलवर रील करणारा सूरजने थेट ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री घेतली तेव्हा साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. सुरजने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला असला तरी त्याचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर सूरजचा त्याच्या बहिणींनी सांभाळ केला. शिक्षण घेता घेता मोलमजुरी करत करत त्याने घरची परिस्थिती सांभाळली.

आणखी वाचा – Video : ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा लेक पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना, एअरपोर्टवर झाले भावुक, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

त्यानंतर सूरजला टिक टॉक या अ‍ॅपबद्दल कळालं आणि याने त्याचं आयुष्य बदललं. बहिणीच्या मुलाने त्याला टिक टॉक या अ‍ॅपची ओळख करुन दिली आणि त्याने बहीणीबरोबर एक व्हिडीओ शेअर केला, जो तुफान व्हायरल झाला आणि हळहळू गांवखेड्यात त्याला प्रसिद्धी मिळू लागली. टिक टॉकवरील व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे त्याला लोकप्रियता मिळू लागली. दरम्यान अनेक कार्यक्रमांच्या, उदघाटनाच्या सुपाऱ्या तो घेऊ लागला. यादरम्यान सूरजने प्रसिद्धीचा पुरेपूर वापर केला. मात्र त्याला त्यावेळी अनेकांनी लुटलं.

आणखी वाचा – निक्की तांबोळी अरबाजच्या प्रेमात?, दोघांमध्ये फुलणार प्रेम, इतर सदस्यांनीही उडविली खिल्ली

या मानधनाबाबत सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात खुलासा केला आहे. सूरज इतर स्पर्धकांसह बोलताना असं म्हणाला की, “टिकटॉकवेळी मला दिवसाला रिबिन कापायला८०,००० हजार रुपये मिळायचे. त्यावेळी एक दिवसाचे मानधन ८०,००० घ्यायचो. आतापण मी एका दिवसाचे ३० ते ५० हजार घेतो. सुरुवातीला पैसा बघून मला लोकांनी खूप लूटलं. त्यामुळे माझ्या बहिणी मला एकच म्हणतात की, तू फक्त नीट राहा.आम्हाला बरं वाटेल”. सुरजचं मानधन ऐकून इतर स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या.

Tags: bigg boss marathi 5Bigg Boss Marathi Fame Suraj ChavanSuraj ChavanSuraj Chavan Income
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Bigg Boss OTT 3 Munawar Farooqui slams Armaan Malik's wife Kritika for wearing tight clothes know more

"टाइट कपडे परिधान करतेस तेव्हा…", मुनव्वर फारुकीने अरमान मलिकची पत्नी कृतिकाला सुनावलं, रडू लागली अन्…; काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.