रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आई-वडिलांचं निधन, आठवीपर्यंत शिक्षण, मजुरी केली अन्…; ‘बिग बॉस मराठी’मध्ये आलेला सूरज चव्हाण असं जगतो आयुष्य, बारामतीमध्ये आहे घर

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi new season fame Suraj Chavan know more

आई-वडिलांचं निधन, आठवीपर्यंत शिक्षण, मजुरी केली अन्...; 'बिग बॉस मराठी'मध्ये आलेला सूरज चव्हाण असं जगतो आयुष्य, बारामतीमध्ये आहे घर

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ शोचा रविवारी थाटात ग्रँड प्रीमियर पार पडला. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमधील १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. आपल्या खास शैलीने व्हिडीओ करणारा सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर सूरज चव्हाणच्या एण्ट्रीने अनेकांना धक्का बसला. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर असलेला सूरज चव्हाणने टिक टॉक आणि त्यानंतर इन्स्टाग्रामवरील रील्सवर आपल्या खास शैलीतील व्हिडीओने धुमाकूळ घातला. ‘गुलिकत धोका’ असे खास आपल्या शैलीत बोलणारा सूरज हा सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय आहे. आपल्या अतरंगी, विनोदी धाटणीच्या व्हिडीओने सूरजच्या रील्सला चांगलाच प्रतिसाद मिळतो. मोबाइलवर व्हिडीओ करणाऱ्या सुरजने ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे. पण त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. चला तर मग जाणून घेऊया सुरज चव्हाणबद्दल…   

बारामती तालुक्‍यातील मोडवे गावचा रहिवासी असलेल्या सूरज चव्हाणचे आयुष्य खूपच खडतर आहे. आई-वडिलांचे छत्र हरपलेला हा मुलगा अवघ्या महाराष्ट्राला आपले आई-वडील मानतो. आई-वडील गेल्यानंतर त्याच्या बहिणीने त्याचा सांभाळ केला. गरीबी व हलाखीच्या परिस्थितीमुळे सुरजने त्याचं शालेय शिक्षणही पूर्ण केलं नाही. त्याने फक्त आठवीपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मोलमजुरी करत घराची परिस्थिती सांभाळली. अशातच एकेदिवशी त्याला टिक टॉक या सोशल मीडिया अ‍ॅपबद्दल माहिती झाली.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – पॅडीकडून वर्षा उसगांवकरांची मस्करी, ब्रश करायलाही घरात पाणी नसल्याने हैराण, म्हणाल्या, “तुला नॉमिनेट करेन”

बहिणीच्या मुलाने त्याला टिक टॉक या अ‍ॅपची ओळख करुन दिली आणि त्याने बहीणीबरोबर एक व्हिडीओ शेअर केला, जो तुफान व्हायरल झाला आणि हळहळू गांवखेड्यात त्याला प्रसिद्धी मिळू लागली. पुढे त्याने स्वत:च्या कमाईने एक मोबईल विकत घेतला आणि त्यावर तो रोज व्हिडीओ बनवून अपलोड करु लागला. सुरज हा लहानपणापासूनच बोबडा बोलतो. बोबडे बोलणे हे त्याचे शारीरिक व्यंग आहे. मात्र हेच व्यंग त्याचे बलस्थान ठरले आणि सोशल मीडियावरील व्हिडीओच्या माध्यमातून त्याने लोकांना आपलेसे केले.

आणखी वाचा – लग्नाच्या पाच वर्षात घटस्फोट, कर्ज, रस्त्यावर राहिली अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर वाईट दिवस, म्हणाली, “मरण आलं असतं तरीही…”

सूरजचे टिक टॉकवरील व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे त्याला लोकप्रियता मिळायला लागली. मात्र कोरोंना काळात टिकटॉक बंद पडले आणि त्याने आपला मोर्चा युट्यूबकडे वळवला. तसेच त्याने मराठी चित्रपटातूनही काम केलं आहे. ‘का रं देवा’ या चित्रपटाद्वारे तो मोठ्या पडद्यावर झळकला आहे. सुरज चव्हाणचा सोशल मीडियावरील चाहतावर्ग हा खूपच मोठा आहे, इन्स्टाग्रामवर त्याचे नऊ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अतरंगी डान्स व्हिडीओ शेअर करणारा सुरज आता बिग बॉसच्या घरात काय जादू करणार, या घरातील सदस्यांना त्याचा काही त्रास होणार का? की तोच सर्वांना त्रास देणार? या घरात त्याचा कितपत निभाव लागणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.           

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi Fame Suraj Chavanmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ankita Walavalkar Lifestyle

घरातून पळून गेली, १२ वर्षांनी मोठ्या मुलाच्या प्रेमात अन्…; कोकण हार्टेड गर्लचं रिलेशनशिप होतं चर्चेत, म्हणालेली, "तो मारायचा अन्…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.