सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या पाच वर्षात घटस्फोट, कर्ज, रस्त्यावर राहिली अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर वाईट दिवस, म्हणाली, “मरण आलं असतं तरीही…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 5:57 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Rashami Desai talked about her broken marriage and her debts of crores.

लग्नाच्या पाच वर्षात घटस्फोट, कर्ज, रस्त्यावर राहिली अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर वाईट दिवस, म्हणाली, "मरण आलं असतं तरीही…"

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकीच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. ‘उतरन’ या टीव्ही मालिकेत तपस्याची भूमिका करून अभिनेत्री रश्मी देसाई लोकप्रिय झाली. रश्मीचे खरे नाव शिवानी देसाई आहे. तिने अभिनय क्षेत्रात आल्यावर नाव बदलले. रश्मी देसाई ही गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्राचा भाग आहे. तिने आजवर आसामीपासून भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांत काम केले आहे. पण रश्मी देसाईंनी तिच्या व्यावसायिक जीवनात जितकी प्रगती पाहिली त्यापेक्षा जास्त दु:खाला तिच्या वैयक्तिक आयुष्यात सामोरं जावं लागलं. रश्मी देसाईने अभिनेता नंदिश संधूशी लग्न केले, पण पाच वर्षांतच हे लग्न तुटले.

यानंतर रश्मी देसाई निराधार झाली, तिच्यावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले आणि तिला रस्त्यावरील कारमध्ये राहावे लागले. पारस छाब्रा यांच्या पॉडकास्टमध्ये रश्मी देसाईने तिच्या आयुष्यातील या वेदनादायी टप्प्याबद्दल सांगितले. रश्मी देसाई हे ‘उत्तरन’द्वारे घराघरात नावारूपाला आले आणि या शोच्या सेटवर तिची नंदिश संधूशी भेट झाली. काही वर्षे डेटिंग केल्यानंतर २०११ मध्ये त्यांनी लग्न केले. पण पाच वर्षांनी त्यांचे हे नाते तुटले.

View this post on Instagram

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

आणखी वाचा – पॅडीकडून वर्षा उसगांवकरांची मस्करी, ब्रश करायलाही घरात पाणी नसल्याने हैराण, म्हणाल्या, “तुला नॉमिनेट करेन”

याबद्दल रश्मी देसाईने सांगितले की, “नंदिश संधूबरोबर लग्न झाल्यानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलले. तिची आणि नंदिशमध्ये बाचाबाची सुरू झाली. एकीकडे संबंध बिघडत होते, तर दुसरीकडे तिच्यावर करोडो रुपयांचे कर्ज होते. रश्मीवर तब्बल ३.२५ कोटी रुपयांचे कर्ज होते. तिने एक घर घेतले होते. त्यावर अडीच कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र तिने हे सर्वकाही गमावले होते.

आणखी वाचा – पुन्हा परदेशात गेली पूजा सावंत, नवऱ्याबरोबर एन्जॉय करत आहे प्रत्येक क्षण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

यापुढे रश्मी देसाईने सांगितले की, “ती ज्या शोमध्ये काम करत होती तो शो अचानक बंद झाला आणि ती रस्त्यावर आली. रिक्षावाले २० रुपयांत जे अन्न खायचे तेच ती खायची. तिचा घटस्फोट झाला आणि तिच्या कुटुंबीयांनीही तिचा निर्णय चुकीचा मानला. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, तिला रस्त्यावरील गाडीत दिवस काढावे लागले. यामुळे ती तणाव व नैराश्यात गेली. त्यामुळे तिला सोरायसिस नावाचाही आजार झाला. यामुळे तिचे वजन खूप वाढले आणि केसही गळू लागले. वाढलेल्या वजनामुळे जगण्यापेक्षा मरण बरे असे तिला वाटू लागले.

Tags: bollywood actressBollywood entertainment newsrashami desaiRashami Desai Broken Marriage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
anup jalota married life

तीन लग्न, दोन घटस्फोट, ३७ वर्षांनी लहान मुलीबरोबर रोमान्स अन्…; 'बिग बॉस' फेम गायकाचं असं होतं आयुष्य, वैवाहिक जीवन वादात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.