सध्या बहरला मधुमास या गाण्याने सर्वत्र धुमाकूळच घातला आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील हे गाणं सध्या सर्वांनाच ठेका धरायला लावतय. पदमश्री शाहीर साबळे यांच्या जीवनपटावर भाष्य करणारा हा चित्रपट येत्या २८ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान चित्रपटातील कलाकार मंडळी ही चित्रपटाच्या आठवणी शेअर करताना दिसतायत. हल्लीच चित्रपटातील मुख्य नायिका सना शिंदे हिने शाहीर साबळे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. तिच्या पाठोपाठ अभिनेत्री अश्विनी महांगडेची पोस्ट लक्षवेधी ठरतेय. या चित्रपटात अश्विनी महांगडे ही एक मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.(Ashvini Mahangade Shahir Sable)
अश्विनीने शाहीर साबळे यांच्या सोबतचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलंय, पद्मश्री शाहीर साबळे (बाबा) यांच्यासोबतचा हा फोटो .. किसनवीर महाविद्यालय, वाई मध्ये शिकत असताना #NSS_CAMP मध्ये काढलेला हा फोटो. #महाराष्ट्रशाहीर फिल्म चे शूट संपल्यानंतर असेच पुस्तकं चाळत असताना त्यात कॉलेज वेळचा एक फोटो अल्बम सापडला ज्यात हा फोटो मिळाला.. ही खरंच एक गोड आठवण आहे. हा फोटो पाहून किती आनंद झाला हे शब्दात सांगू शकत नाही. महाराष्ट्रशाहीर हा चित्रपट 28 एप्रिल ला आपल्या भेटीस येत आहे.
फोटोसोबत अश्विनीची भावुक पोस्ट (Ashvini Mahangade Shahir Sable)
याआधीही अश्विनीने केदार शिंदे यांच्यासोबतचा एक किस्सा शेयर केला होता. ज्यामध्ये तिने तिच्या बाबांची आठवण सांगितली होती. तिच्या बाबांनी केदार शिंदे यांच्या नाटकात काम केले होते आणि आज ती शाहीर साबळे या केदार शिंदे यांच्या चित्रपटात काम करत आहे असा योगायोग तिने शेअर केला होता.(Ashvini Mahangade Shahir Sable)
महाराष्ट्राच्या मातीतील थोर समाजसुधारक आणि शाहीर म्हणून ओळखले जाणार कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे यांच्या जीवनावर भाष्य करणारा नवाकोरा सिनेमा महाराष्ट्र शाहीर चित्रपटप्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. महाराष्ट्राची लोकधाराचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहीर साबळेंनी गण, नमन, पोवाडा, बतावणी, भारूड यांच्या मार्फत समाजामध्ये समाजसुधारणा करण्याचा प्रयत्न केला. (Ashvini Mahangade Shahir Sable)
हे देखील वाचा – अनघाचा बोल्ड अंदाज पाहून चाहत्याने केली मजेशीर कमेंट
शिवाय बऱ्याच चळवळींमध्ये शाहीर साबळे यांनी महत्वपूर्ण पुढाकार घेतला होता. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्याच्या पहाडी आवाजाने गायलेले जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं आजही प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या हृदयात हे गाणं वाजतंय. ही त्यांची आठवण मराठी माणूस जोवर जिवंत आहे तोवर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात राहील यांत शंकाच नाही.
