‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे पारू मारुतीशी बोलत असते. ती मारुतीला सांगते तू माझं सर्वस्व आहेस, तुला काही झालं तर मी जगू शकणार नाही. मारुती पारूच्या डोळ्यात डोळे घालून बघायला तयार नसतो तेव्हा पारू त्याला धीर देते आणि सांगते की, तु माझा चेहरा पाहिल्याशिवाय तुझा दिवसही सुरु होत नाही आणि आज तू माझ्याकडे पाहतही नाही आहेस. बा तू एकदा माझ्याकडे पहा. मी या सगळ्या गोष्टी मार्गी लावेल. तुला आणि गनीला याच्यापुढे त्रास होणार नाही याची काळजी घेईन, तू काहीच काळजी करु नको, हे ज्याच्यामुळे सुरु आहे ते सगळं काही मी आज संपवायचा निर्णय घेतला आहे. (Paaru Serial Update)
या झाल्या चुकीचा देवालाही त्रास झाला असेल त्यामुळे मी देवाची माफी मागून येते असं म्हणून ती मंदिरात जायला निघते. तर घरातून निघताना पारूला सावित्रीशी बोलायचं असतं. सावित्रीशी ती बोलायला जाते तेव्हा सावित्री तिच्याशी बोलायला नकार देते. मात्र पारू सांगते की, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, तेव्हा सावित्री सांगते की, तू इतकी स्वार्थी असशील असं मला वाटलं नव्हतं. तुझा खरा चेहरा नेमका काय आहे तेच मी ओळखू शकले नाही. तुला पाहिलं तरी मला किळस येतो. किर्लोस्कर घराची सून होण्यासाठी तू हे सगळं करत आहेस ना?, तुझा बाप जीव द्यायला निघाला होता. शेवटी स्वतःच्या स्वार्थासाठी तुझ्या बापाचा ही जीव घ्यायला तयार झालीस का?, तुला कोणाची काही पडलेला नाही. सावित्रीचं टोचून बोलणं पारुच्या मनाला खूप लागतं आणि शेवटी ती मंगळसूत्र काढण्यासाठी मंदिरात जाते.
तर इकडे आदित्य पारुला भेटायला आलेला असतो तेव्हा पारू घरात नसते ते पाहून गणी सांगतो की, तायडी मंदिरात गेली आहे. तेव्हा आदित्यही मागून मंदिरात जातो. मंदिरात आल्यावर दोघेही देवाकडे झाल्या प्रकाराबाबत माफी मागतात. तर आदित्य पारुला सगळी सुख मिळू दे म्हणून देवाशी भांडत असतो. तर इकडे पारूसुद्धा माझ्यामुळे कोणाला दुःख मिळू दे नको, मी मानलेले हे नातं मला तोडून टाकायची शक्ती दे, असं सांगत असते. तितक्यात तिथं आदित्य येतो. तो पारूला विचारतो की, पारू तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस का?, यावर पारू आदित्यला सगळं खरं सांगायचं ठरवते. आदित्य सर जाहिरातीत आपण लग्न झालं, विधी झाले हे जाहिरातीतलं लग्न हरीश सरांबरोबर होणार होते पण तुम्ही त्या जागी बसलात. हे जाहिरातीतल्या लग्न मी खरं मानलं आहे. जाहिरातीच्या दिवशी तुम्ही माझ्या गळ्यात बांधलेला मंगळसूत्र आजही माझ्या गळ्यात आहे, असं म्हणत ती आदित्यला मंगळसूत्र दाखवते. हे बघून आदित्यला धक्काच बसतो.
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्य पारुला म्हणतो की, ते जाहिरातीतले लग्न होतं तू असा विचार का करत आहेस, तुला काही कळतंय का?, हे जर सगळ्यांसमोर आलं तर, आधीच आई माझ्याशी ही गोष्ट लपवून ठेवली म्हणून बोलत नव्हती आता तुला काय माझ्या आईपासून मला तोडायचे आहे का?, असा प्रश्न तो पारूला करतो. आता पारू या सगळ्यावर काय निर्णय घेणार हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.