‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अखेर भर हळदीच्या दिवशी हरीश कोणालाही काहीही न सांगता निघून गेलेला असतो. हरीश घर सोडून गेला आहे त्यामुळे अहिल्यादेवींचा राग अनावर होतो. अहिल्यादेवी म्हणतात, काही झालं तरी मी पाताळातून हरीशला शोधून काढेन आणि त्याला माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावीच लागतील. त्यावेळेला मारुती पुढे येतो आणि अहिल्यादेवींची माफी मागतो की, माझ्या लेकीचं नशीबच माझ्यासारखे फुटके आहे. दोन वेळा लग्नाचा योग येऊन असं झालं याला मीच जबाबदार आहे.
असं म्हणत तो स्वतःवर सगळ्या गोष्टींचं खापर फोडून घेतो. त्यावेळेला तो पारूच्या आईची आठवण काढत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दाखवतो आणि सांगतो की, हे पारूच्या आईचं मंगळसूत्र आहे. (Paaru Serial Update)
पारूचं लग्न व्हावं आणि ते तिने पाहावं अशी तिची खूप इच्छा होती पण आता पारूचं लग्न होत नाहीये तर हे मंगळसूत्र तरी कशाला ठेवायला हवा असं म्हणून ते मंगळसूत्र तो फेकून देतो. तेव्हा ते मंगळसूत्र आदित्य उचलतो आणि पारूच्या हातात देतो आणि सांगतो की, तुझं लग्न होणार याची जबाबदारी माझी आहे. तू काही काळजी करु नकोस. तर मारुती इकडे खूपच खचलेला असतो. लेकीचं लग्न मोडल्यामुळे मारुती खूपच खचलेला असतो तर अहिल्यादेवी हरीशवर फारच नाराज असतात. त्यानंतर मारुती सगळ्यांची माफी मागून किर्लोस्कर बंगल्यातून बाहेर पडतो आणि एका चहाच्या टपरीवर जाऊन बसतो. तर पारू आणि गणी घरी येतात तेव्हा गणि रडत असते त्यावेळेला एक व्यक्ती येऊन सांगतो की, पारू तुझे बाबा तिथे बसून काहीतरी बडबड करत आहेत. तेव्हा पारू व गणी धावत धावत मारुतीला आणायला जातात. तिथे दोन माणसं उभी असतात.
पारू व मारूतीचं बोलणं ऐकून त्यांच्या लक्षात येतं की हिचं लग्न मोडलं आहे. तेव्हा ते पुढे येतात आणि म्हणतात की, तुला जावई हवाय?, एक नाही तर दोन जावई मिळतील. हिच्या एवढी सुंदर देखणी मुलगी असताना कोणता मुलगा हिला सोडून गेला असं ते म्हणतात. त्या क्षणी आदित्य तिथे येतो आणि दोघांच्या सणसणीत कानाखाली लगावतो आणि सांगतो की, तुम्ही कोणाशी बोलता हे तुमच्या लक्षात येत आहे का?, ही किर्लोस्कर घरातली माणसं आहेत. तुमची लायकी तरी आहे का असं म्हणून तो मारुती पारुला आणि गणीला घरी घेऊन येतो. मारुतीला तो झोपायला सांगतो. त्यानंतर आदित्य पारूला विचारतो की, तू व हरीश काही महत्त्वाचे बोलणार होता ते नेमकं काय होतं तुला काही याच्याबद्दल माहिती आहे का?, तू काही आमच्यापासून लपवत नाही आहेस ना?, तर यावर पारू सांगते असं काहीच नव्हतं. यावर आदित्य विश्वास ठेवतो आणि घरी निघून जातो. तर इकडे पारू अहिल्यादेवींना भेटायला आलेली असते. तेव्हा अहिल्यादेवी पारूला मुलगी मानतात त्यामुळे त्या तिची समजूत काढतात. आणि सांगतात की, तू माझी मुलगी आहेस. आता रडायचं नाही. पदर खोचून ही लढाई लढायला सज्ज होऊ. तुझ्या नशिबात काय आहे ते कोणालाच माहिती नाही, असं सगळं काही त्या म्हणत असतात.
तर इकडे दिशा व दामिनी यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरु असतं. पारू आता लग्न न झाल्यानं इथेच राहणार याचं त्यांना टेन्शन आलेलं असतं. शिवाय त्या चिठ्ठीत नेमकं काय आहे ते हळदीमुळे दिसले नाही पण अहिल्यादेवीना जर आपण या चिठ्ठी बाबत सांगितलं तर पारू नक्की त्यांच्यापुढे सगळं काही खरं खरं सांगेल असं त्या ठरवून प्लॅन करतात. आता मालिकेच्या पुढील भागात पुढे काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.