मराठीसह हिंदी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने व सौंदर्याने मोहिनी घालणारी ‘कलरफुल’ अभिनेत्री म्हणजे पूजा सावंत. मराठी मनोरंजन सृष्टीतली ही लोकप्रिय अभिनेत्री काही दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकली. ‘मन धागा धागा जोडते नवा’ म्हणत पूजाने मराठीसह हिंदी सिनेविश्वातदेखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. आपल्या अभिनयाने व हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी पूजा तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली. २८ फेब्रुवारी रोजी पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला ५ महिने पूर्ण झाले आहेत. आपल्या अनोख्या भूमिकांनी चर्चेत राहणारी पूजाही सोशल मीडियावरदेखील तितकीच चर्चेत राहत असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
अशातच पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पूजाने तिचा नवरा सिद्धेश चव्हाणसह एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. पूजाने एका खास गाण्यावर रील व्हिडीओ शूट केला असून तो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. यामध्ये पूजा व सिद्धेशचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. ‘घरत गणपती’च्या ‘नवसाची गौरी माझी’ या गाण्यावर रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये पूजाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर तिच्या नवऱ्याने काळ्या रंगाचा कपडे परिधान केले आहेत.
‘घरत गणपती’ या चित्रपटामधील ‘नवसाची गौरी माझी’ या गाण्याची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरु आहे. या व्हिडीओवर अनेकांकडून रील व्हिडीओ बनवले जात आहेत. अशातच पूजानेही या खास गाण्यावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओबरोबर तिने ‘घरत गणपती’मधील मुख्य अभिनेता भूषण प्रधान व चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. “मी सिद्धेशबरोबर हे गाणं पोस्ट करायची वाट पाहत होते” असंही म्हटलं आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस’ शो स्क्रिप्टेड असतो का? स्पष्टचं बोलला रितेश देशमुख, म्हणाला, “या शोची…”
दरम्यान, पूजाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओला पूजाच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक कलाकारांनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत व्हिडीओ आवडल्याचे म्हटले आहे.