सध्या ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोची सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस’मराठीचा पाचवा सिझन लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. येत्या २८ जुलै रोजी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर हा सिझन सुरु होणार आहे. त्यामुळे सध्या या सिझनची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. पण या सिझनमध्ये नेमके कोणते स्पर्धक सहभागी होणार याची सगळ्यात जास्त उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. दोन महिन्यांपूर्वी खास प्रोमो शेअर करत या सिझनच्या होस्टसाठी रितेश देशमुखच्या नावाची घोषणा करण्यात आली. (Riteish Deshmukh On Bigg Boss Marathi 5)
यंदाच्या पर्वात प्रेक्षकांना अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे. मांजरेकरांच्या जागी आता रितेश सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. तर रितेश हिंदी बिग बॉसमध्येही शो होस्ट करताना दिसणार का?, मात्र आता रितेश मराठी ‘बिग बॉस’मध्ये सूत्रसंचालक म्हणून दिसणार आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेशची दमदार एण्ट्री पाहायला मिळाली. नुकतीच ‘बिग बॉस सिझन ५’ची पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना रितेशने या शोसाठी का होकार दिला याबाबत भाष्य केलं आहे.
या शोसाठी होकार देण्याचे कारण सांगत रितेश म्हणाला, “दोन तीन शूट माझे होते पण मी ते शूट मी शिफ्ट करत या चित्रीकरणाला होकार दिला. मी या चित्रीकरणासाठी खूप उत्सुक आहे. या शोला होकार देण्याचं कारण म्हणजे जो एका शोचा फॅन असतो त्यात सहभागी व्हायची आपल्याला संधी मिळाली तर यासाठी कोण नकार देणार?, म्हणून मी होकार दिला. आणि ‘बिग बॉस या रिऍलिटी शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणं हे मिळालेल्या संधीपेक्षा खूप मोठी संधी आहे असं मला वाटतं”.
आजवर रितेशने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मीडियावरही रितेश बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. सध्या रितेश ‘बिग बॉस’मराठी सिझन ५च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.