शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बायकोचा दरारा! रितेश देशमुखने जिनिलियासमोर सुधारली ‘ती’ चूक, दादा-वहिनींचा व्हिडीओ चर्चेत  

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 19, 2024 | 4:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riteish and Genelia Deshmukh shared a funny video of them see the details

Video : बायकोचा दरारा! रितेश देशमुखने जिनिलियासमोर सुधारली ‘ती’ चूक, दादा-वहिनींचा व्हिडीओ चर्चेत

बॉलिवूडसह मराठी मनोरंजनसृष्टीतली लोकप्रिय जोडी म्हणजेच रितेश देशमुख व जिनिलिया देशमुख. या जोडीला इंडस्ट्रीत आदर्श जोडी मानलं जातं. रितेश-जिनिलिया नेहमीच त्यांच्या मजेशीर रिल्समुळे चर्चेत असतात. दोघंही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अभिनयासह आपल्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही दोघं चाहत्यांबरोबर शेअर करत असतात आणि त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. त्यांचे अनेक व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. अशातच रितेशने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

रितेश-जिनिलिया नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ शेअर करीत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. अशातच रितेशने नुकतीच एक नवीन रील त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये रितेशने कुर्ता परिधान केला आहे, तर जिनिलियाने भरजरीस साडी परिधान केली आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलिया रितेशला तिच्यामागे एक गाणं म्हणायला सांगते. यावर रितेश ते गाणं म्हणतो. पण ते गाणं म्हणताना एक चूक करतो आणि त्यामुळे तो गोंधळून जातो.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

हेही वाचा – “पैसे मागण्यासाठी लाज सोडून…”, उषा नाडकर्णींचा ‘त्या’ गाजलेल्या चित्रपटाबद्दल व निर्मात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या, “त्यादिवशी मी…”

या व्हिडीओमध्ये जिनिलिया रितेशला “गाण्याची एक ओळ मी गाते आणि एक तू गा” असं म्हणते आणि ती गाण्याच्या “जाती हूं में” ही ओळ गाते. यावर रितेश चुकून “जल्दी तू जा’ असं म्हणतो. ही ओळ गाताच त्याचा गोंधळ उडतो आणि त्याला आपली चूक झाली असल्याचे कळताच तो “जल्दी है क्या” असं म्हणत त्याची चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो. पुढे जिनिलिया रितेशकडे रागात बघते. रितेश- जिनिलियाचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा – मुस्लिम मुलाबरोबर लग्न करणार असल्याचं कळलं अन्…; सोनाक्षी सिन्हानेच केला वडिलांच्या प्रतिक्रियेचा खुलासा, अभिनेत्री म्हणाली…

रितेश- जिनिलियाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओखाली एकाने “रितेशच्या तोंडून चुकून खरं निघालं” अशी कमेंट केली आहे. तर एकाने “आजच्या या घटस्फोटाच्या जगात सर्वांना असं प्रेम मिळूदेत” अशी कमेंट केली आहे. याशिवाय अनेकांनी “माझी आवडती जोडी, दादा आणि वाहिनीची जोड़ी १, हृदयातले वाक्य चुकून तोंडातून निघालं” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. नेकांनी हसण्याचे इमोजी शेअर करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.   

Tags: genelia deshmukhmarathi entertainment newsriteish deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
shweta tiwari affair

श्वेता तिवारीबरोबर अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचं भाष्य, खुलासा करत म्हणाला, म्हणाला, “आम्ही एकमेकांबरोबर...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.