‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत आलेल्या रंजक वळणामुळे ही मालिका साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेने तब्बल सहा वर्षांचा लीप घेतला आणि त्यानंतर ही मालिका प्रेक्षकांच्या मनात अधिक घर करु लागली. असं असलं तरी प्रेक्षक या मालिकेतील आनंदीला मिस करताना दिसले. मालिकेत सार्थक व आनंदी यांच्यातील दुरावा प्रेक्षकांना काहीसा आवडला नाही. त्यावेळी प्रेक्षकांनी मालिका पाहणं बंदही केलं होतं. गैरसमजामुळे आनंदी घर सोडून गेलेली असते. (man dhaga dhaga jodate nava serial)
अशातच सध्या मालिकेत सार्थकच्या आयुष्यात सुखदा हे पात्र आलेलं पाहायला मिळत आहे. सध्या सार्थक व सुखदा यांची चांगलीच मैत्रीही झालेली पाहायला मिळत आहे. सुखदाच्या येण्यानंतर मात्र प्रेक्षकांनी मालिकेत आनंदीला पुन्हा आणा असं सांगितलं. मालिकेत आता अखेर आनंदीची एंट्री झाली आहे. मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये आनंदी एका आश्रमातील लोकांचे प्रॉब्लेम्स सोडवताना दिसत आहे.
“नशीब. आनंदी पुन्हा आली कारण तिच्याशिवाय मालिका बघायला मालिकाचं येत नव्हती”, “शेवटी आमचा आनंद परत येतोय आणि सार्थक व आनंदीला एकत्र दाखवा. आनंदीच सार्थकच्या आयुष्यात परत येऊ द्या”, “अरे वा मस्त छान आहे. आता मी रोज मालिका बघेल”, “आनंदी नव्हती तर मी मालिकाचं बघत नव्हते आता मी मालिका रोज बघणार”, अशा अनेक कमेंट करत आनंदीचं स्वागत केलं आहे. आणि पुन्हा आनंदीला मालिकेत पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
मालिकेत आनंदीने भावासाठी आणि सार्थकच्या आईने घातलेल्या अटींसाठी सार्थकपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. आनंदी मालिकेत दिसत नसतानाच आता मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. ही भूमिका अभिनेत्री मयुरी देशमुख साकारत आहे. मयुरीच्या मालिकेतील एण्ट्रीनंतर प्रेक्षक आनंदीबाबत चर्चा करताना दिसत आहेत.