रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रितेश-जिनिलीयाच्या मुलांनी अशी साजरी केली आषाढी एकादशी, एकत्र बसून फराळाचा आनंद घेतला अन्…; संस्कारांचं कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 17, 2024 | 3:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riteish Deshmukh's sons are fasting on the occasion of Ashadhi Ekadashi and Genelia shared a video of them breaking fast.

Video : रितेश-जिनिलीयाच्या मुलांनी अशी साजरी केली आषाढी एकादशी, एकत्र बसून फराळाचा आनंद घेतला अन्…; संस्कारांचं कौतुक

जिनिलीया व रितेश देशमुख ही जोडी मराठीसह हिंदी कलाविश्वातील प्रचंड लोकप्रिय जोडी आहे. या जोडप्याचा मराठीसह बॉलीवूडमध्ये प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे ‘दादा-वहिनी’ म्हणून ओळखलं जातं. एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलंदेखील आहेत. रितेशची पत्नी जिनिलीया ही मूळची मराठी नसली तरी देशमुखांच्या घरी आल्यावर तिने सगळे मराठी सणवार, रितीरिवाज, परंपरा साजऱ्या केल्या आहेत.

जिनिलीया प्रत्येक मराठी सण आपुलकीने साजरे करताना दिसते. गणपती असो, होळी असो, वटपौर्णिमा असो किंवा आजची आषाढी एकादशी असो. जिनिलीया नेहमीच मोठ्या आनंदाने आपली मराठी संस्कृती कायम जपते. जिनिलीयाने हेच संस्कार तिच्या दोन्ही मुलांवरदेखील केले आहेत. रितेश-जिनिलीया यांच्या दोन्ही मुलांची नावे रियान व राहील अशी असून या दोन त्यांनी आपल्या मुलांवर मराठमोळे संस्कार केले आहेत आणि हे संस्कार वेळोवेळी दिसूनही आले आहेत. अशातच आज सर्वत्र आषाढीनिमित्त भक्तीमय वातावरण असून आज सर्वांचा उपवासदेखील आहे.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – “आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं आणि…”, वडिलांच्या निधनानंतर जय दुधाणेने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “सावरायला हवं पण…”

आजच्या या आषाढी एकादशीनिमित्त रितेश-जिनिलीया यांच्या मुलांनीदेखील उपवास धरला असून त्यांनी साग्रसंगीत फराळदेखील केला आहे. याची झलक जिनिलीयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली आहे. जिनिलीयाने तिच्या  इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिची दोन्ही मुलं, सासू म्हणजेच वैशाली देशमुखही पाहायला मिळत आहेत. “लातूरमध्ये एकादशीनिमित्त दुपारचे जेवण” असं म्हणत तिने हा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “माझं लग्न…”, वैवाहिक आयुष्याबद्दलच्या अफवांवर गीता कपूर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या, “मी गुपचूप…”

जिनिलीया व रितेश ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारी जोडी आहे. रितेश व जिनिलीया हे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. जिनिलीया व रितेश हे त्यांच्या मुलांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरुन पोस्ट करताना दिसतात.     

Tags: genelia deshmukhmarathi entertainment newsriteish deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
man dhaga dhaga jodate nava serial

"आता मालिका रोज बघणार", ‘मन धागा…’ने घेतलं सहा वर्षांचं लीप, आनंदीच्या कमबॅकने प्रेक्षकही खुश, म्हणाले, "सार्थकच्या आयुष्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.