शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझं लग्न…”, वैवाहिक आयुष्याबद्दलच्या अफवांवर गीता कपूर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या, “मी गुपचूप…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 17, 2024 | 1:42 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Geeta Kapoor broken silence on the rumors about her married life and her secret marriage

"माझं लग्न...", वैवाहिक आयुष्याबद्दलच्या अफवांवर गीता कपूर यांनी सोडलं मौन, म्हणाल्या, “मी गुपचूप..."

गीता मा हे नाव बॉलिवूडमधील कोणत्या ही व्यक्तीसाठी नवीन नाही. गीता माने तिच्या डान्सिंग स्किल्सने सगळ्यांच्या मनात जागा केली आहे. गीता मा अनेक रिअॅलिटी शोच्या परिक्षकाचे काम करते.  छोट्या पडद्यावरील जवळपास प्रत्येक डान्सिंग रिॲलिटी शोमध्ये त्या जजची भूमिका साकारतात. गीताने वयाच्या १५ व्या वर्षापासूनच डान्सच्या करिअरला सुरुवात केली होती. तिने ‘तुझे याद ना मेरी आइ’, ‘गोरी गोरी’ अशा अनेक गाण्यांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केले आहे. आपल्या नृत्यकौशल्याने व परीक्षणाने चर्चेत राहणारी गीता मा सध्या तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे.

गीता कपूरने गुपचूप लग्न केल्याची अफवा पसरली आहे. यावर ‘नवभारत टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गीता कपूरने मौन सोडले आहे. याबद्दल बोलताना तिने असं म्हटलं की, ‘चित्रपट उद्योगाशी संबंधित असलेल्या आपल्या सर्वांना अनेकदा आपल्या संपत्तीबद्दलच्या अनेक अफवांना सामोरे जावे लागते. जसे की माझ्याबद्दल कोणीतरी लिहिले होते की, माझ्याकडे करोडोच्या गाड्या आणि बंगले आहेत. ते वाचून मला आश्चर्य वाटले की, ते सर्व कुठे आहेत. मलाही कळलं पाहिजे, की या करोडो रुपयांच्या गाड्या नक्की कुठे आहेत? मला त्या चालवायच्या आहेत, हे करोडोचे बंगले कुठे आहेत, तिथे मला राहायचं आहे. आमच्याकडे असलेल्या मालमत्तांची माहिती सरकारला आहे आणि आम्ही त्यावर करही भरतो”.

View this post on Instagram

A post shared by Geetakapur (@geeta_kapurofficial)

आणखी वाचा – “आषाढी एकादशीला भारतात नाही पण…”, संकर्षण कऱ्हाडेला परदेशात मिळाला विठ्ठल पूजेचा मान, म्हणाला, “प्रयोग सुरु करायच्या आधी…”

यापुढे ती असं म्हणाली की, “माझ्याबद्दल आणखी एक अफवा पसरली आहे की, मी विवाहित आहे आणि मी गुपचूप लग्न केले आहे. जे की मी केलं नाही. माझे लग्न झाले असते तर मी अभिमानाने सांगितले असते. त्यामुळे मी विवाहित आहे ही अफवा थांबली पाहिजे”. गीता कपूर सध्या सोनी टीव्हीच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर 4’ या डान्स रिॲलिटी शोचे परीक्षण करत आहे. गीता व टेरेन्स लुईस २०२० च्या पहिल्या सीझनपासून या शोचे परीक्षण करत आहेत. करिश्मा कपूर या सीझनमध्ये तिसरी परीक्षक म्हणून सामील झाली आहे.

आणखी वाचा – “आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं आणि…”, वडिलांच्या निधनानंतर जय दुधाणेने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला, “सावरायला हवं पण…”

दरम्यान, ५ जुलै १९७३ रोजी मुंबईत जन्मलेल्या गीता कपूर हे नृत्यविश्वातील एक मोठे नाव आहे. आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी कोरिओग्राफ करणाऱ्या गीता कपूरने वयाच्या १५ व्या वर्षी फराह खानची सहाय्यक म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

Tags: Geeta KapoorGeeta Kapoor Newsmarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोढी पुन्हा परतणार?, निर्मात्यांची भेट घेताना दिसला, चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.