सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांच्या आयुष्यातही चढ उतार येत असतात. या चढ उतारांना ते ही सामोरे जातात, बरेचदा आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे एखाद्याच हृदय हेलावतं. बरेचदा एखादी गोष्ट घडल्याने आपल्या भावनाही दुखावल्या जातात. एखादा मनुष्य आयुष्यात कितीही यशस्वी झाला तरी त्याला त्याच्या वाटचालीदरम्यान सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना हा करावा लागलेलाच असतो. असे म्हणतात ना प्रत्येक यशामागे अपयशाची, नाराजगीची पायरी ही चढावीच लागते. मनाला संवेदना होणारी अशीच एक घटना घडली होती. प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांच्यासोबत. डॅम इट आणि बरंच काही या पुस्तकात महेश कोठारे यांनी त्यांनी अनुभवलेला एक वाईट किस्सा सांगितला आहे.(Mahesh Kothare Incindent)
पहा काय घडलं होत महेश कोठारेंसोबत (Mahesh Kothare Incindent)
दरम्यान पुस्तकात त्यांनी एक किस्सा लिहिला आहे की, चित्रपटांची सगळी धामधूम सुरू असताना एक चटका लावणारी घटनाही महेश कोठारे यांच्याआयुष्यात घडली. आणि घटनेचा उल्लेख हा करायलाच हवा. १९६९ साली ते वरळी नाक्यावर राहत होते. तेथे त्यांच घर तळमजल्यावर होतं. त्यावेळचा किस्सा सांगत म्हारेश यांनी लिहिलंय, दररोज सकाळी जिमला जायची माझी सवय होती.

हॉलमध्ये बसून शूज घालत असताना टेबलाकडे माझी नजर गेली आणि मी जोरात ओरडलो. मला पुरस्काररूपी आजवर मिळालेल्या सर्व ट्रॉफीज आणि बाहुल्या गायब झाल्या होत्या. मी घाबरून इकडे-तिकडे पाहिलं. बाल्कनीचा दरवाजा उघडा होता. मी घाबरत घाबरत जेनमाला हाक मारली. तीही धावतपळत आली. “माझ्या ट्रॉफीज?” एवढे दोन शब्दच माझ्या तोंडून बाहेर पडले.(Mahesh Kothare Incindent)
हे देखील वाचा – ‘बाकीच्यांच्या सिनेमांवर माझं घर चालतं आणि महेशच्या सिनेमांमुळे…’ लक्ष्याने दिल होत पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर
“माझ्या ट्रॉफीज तू कोणाला साफ करायला दिल्या आहेस का ?” आता जनमाची ट्यूब पेटली होती. ट्रॉफीज ठेवलेल्या टेबलाकडे तिची नजर गेली आणि तिथं एकही ट्रॉफी नसल्याचं पाहून ती देखील हादरली. एव्हाना डॅडीही आपल्या बेडरूममधून चालत हॉलमध्ये पोहोचले होते. रिकामं टेबल आणि बाल्कनीचं उघडं दार पाहून आम्हा तिघांनाही रात्री कोणीतरी आमच्या घरात प्रवेश करून सर्व ट्रॉफीजवर डल्ला मारल्याची कल्पना आली.

या ट्रॉफीमध्ये महेश कोठारे यांच्या ‘राजा और रंकाची रौप्यमहोत्सवाची ट्रॉफी, आंध्र प्रदेश फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे ‘मेरे लाल’ चित्रपटासाठी दिलेली ट्रॉफी, ‘घर घर की कहानी ची ट्रॉफी, तसेच राज्य सरकारच्या ‘छोटा जवान’ च्या ट्रॉफीसह इतर आणखी काही ट्रॉफीही चोरीला गेल्या होत्या. या चोरी प्रकरणाची त्यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रार ही दाखल केली. त्यानुसार पोलीस ही त्यांच्या घरी येऊन हातांचे ठसे घेऊन आले; परंतु ते पोलिसांच्या नोंदीमध्ये असलेल्या चोरांच्या ठशांशी जुळले नाहीत.(Mahesh Kothare Incindent)
हे देखील वाचा – ‘तब्बल ६० वर्षांनी कोठारे कुटुंबात कन्यारत्न जन्मास आलं आणि…’
यावेळी महेश कोठारेंनी पुढे लिहिलंय, मग एक-दोन दिवसांमध्ये लक्षात आलं की चोरी झालेल्या दिवसापासून आमच्या इमारतीचा सुरक्षारक्षकच गायब झाला होता. तेव्हा पोलिसांना खात्री पटली की त्यानंच ही चोरी केली असावी. मग त्याचा शोध सुरू झाला; पण हा सुरक्षारक्षक शेवटपर्यंत काही सापडला नाही. चोरीच्या प्रकरणानंतर आमच्या लक्षात आलं, की हा सुरक्षारक्षक नेहमीच आमच्या घरी यायचा आणि घरातल्या भितीवर लावलेल्या ट्रॉफीजकडे निरखून पाहायचा.
एकदा त्यानं डॅडीना विचारलं देखील होते की, “साहब, इसका कितना किमत होगा?” तेव्हा डॅडींनी त्याला या ट्रॉफीज ‘अनमोल’ असल्याचं सांगितलं होतं. बहुधा त्याला ‘अनमोल’ हा शब्द नीट समजला नसावा आणि काहीतरी प्रचंड पैसे मिळतील या लालसेनं त्यानं त्या चोरून नेल्या असाव्यात. महेश कोठारे यांनी कमावलेल्या ट्रॉफी किमतीपेक्षा अनमोल होत्या हे चोरी करणाऱ्याला कदाचित कळण्याची कुवत नसावी म्हणून ही घटना घडली असावी.
