बाप आणि लेकीचं नातं हे आई आणि मुलीच्या नात्यापेक्षा कुठेतरी अधिक घट्ट असतं किंवा जवळच असत. लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळलेली आपली लेक कधी अचानक मोठी होते हे बरेचदा कळतही नाही. शेवटी तो दिवस येतोच. हो मी बोलतेय मुलीच्या लग्नाविषयीच. बापाचं काळीज हेलावून टाकणारा हा क्षण त्याच्या आयुष्यात येवो वा न येवो या द्विधा मनस्थितीत तो अडकलेला असतो. प्रत्यक्ष रिअल लाइफबरोबरच रील लाईफमध्येही या अनुभवाची प्रचिती येतेच. बऱ्याच मालिका या बाप लेकीच्या नाटयवर भाष्य करणाऱ्या असतात. (Milind Gawali Post Viral)
अशातच स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका जरी आईभोवती फिरत असली तरी मालिकेती बाप लेकीचं नातं आणि बापाची मुलीसाठीची काळजी ही मनाला चटका लावून जाणारी आहे. या मालिकेत अनिरुद्ध आणि इशा अशी बापलेकीची जोडी पाहायला मिळतेय. मालिकेत आलेल्या रंजक वळनामुळे यशने लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो, मात्र अनिरुद्ध तिच्या लग्नाला विरोध करतो आणि सांगतो की अद्याप तुला बरंच शिकायचंय, तुला तुझं करिअर करायचंय. मात्र इशा वडिलांच्या या निर्णयाला विरोध करते.
पहा अनिरुद्धची भावुक पोस्ट (Milind Gawali Post Viral)
याबाबतची एका बापाची व्यथा अनिरुद्ध च्या माध्यमातून मांडत मिलिंद गवळी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने लिहिलंय, अनिरुद्ध खूप चुकीचा वागतो आहे, एका चांगल्या कार्यात विघ्न आणतो आहे असं सगळ्यांनाच वाटणं साहजिक आहे, पण खरंच विचार केला तर अनिरुद्ध च म्हणणं अगदी बरोबर आहे, अनिरुद्ध म्हणतोय जोपर्यंत माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहत नाही , ती तिचं शिक्षण पूर्ण करत नाही , तिला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते स्वप्न ती पूर्ण करत नाही , तोपर्यंत लग्नाच्या बेडीत तिला अडकवायचं नाही, बाप म्हणून त्याला त्याची मुलगी खूप चांगली माहिती आहे..(Milind Gawali Post Viral)
दोन वेळा ती प्रेमात फसली आहे, आता त्याचा तिच्या या प्रेमावर विश्वास नाही, त्याचं म्हणणं आहे की साखरपुडा झाल्यानंतर कशावरून यश आणि गौरी सारखा तिचाही साखरपुडा मोडणार नाही, त्याचं म्हणणं आहे की आधी शिक्षण पूर्ण करा, आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे रहा, आणि मगच हा लग्नाचा विचार करा, अनिरूद्ध असेही म्हणतो की , मुलगा पण अजूनही सेटल झालेला नाही , तोही अजूनही शिकतो आहे, मग एवढ धाई कशासाठी, अनिरुद्ध बाप म्हणून कुठेही चुकत नाही आहे कदाचित त्याची ही समजावण्याची पद्धत खूप चुकीची आहे., पण ती अनिरुद्ध ची पद्धत आहे , तो वेगळा वागूच शकत नाही वेगळ्या पद्धतीने अनिरुद्ध समजावू शकत नाही.(Milind Gawali Post Viral)
हे देखील वाचा – बायकोचा हात हातात प्रभाकर मोरेंचा समुद्रकिनारी रोमँटिक अंदाज
मुलीवर अतोनात प्रेम करणारा , तिच्यावर जीव लावणारा , तिच्यासाठी खूप मोठी स्वप्न बघणारा हा अनिरुद्ध आता पुढे काय करतोय, हे बघायला खूपच मजा येणार आहे.. पुढचे सीन्स मी शूट केलेले आहेत, जे मला स्वतःला खूप भावले आहेत , पण ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, “आई कुठे काय करते “ही मालिकासिरीयल पहात रहा तुमचं तुम्हालाच लवकर समजेल.
