रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंबानींचा नादच नाय! लग्नात आलेल्या पाहुण्यांना दिल्या महागड्या भेटवस्तू, किंमती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 14, 2024 | 2:21 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Anant Ambani gifted watches worth 2 to 3 crores to his wedding guests shahrukh khan and ramveer singh.

अंबानींचा नादच नाय! लग्नात आलेल्या पाहुण्यांना दिल्या महागड्या भेटवस्तू, किंमती ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांनी नुकतीच शुक्रवारी १२ जुलै रोजी एकमेकांसाठी विवाहगाठ बांधली. या विवाह सोहळ्यासाठी केला गेलेला थाटमाट हा फारच नेत्र दीपक होता. या सोहळ्यात केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातील मोठमोठ्या दिग्गज व्यक्तींनीसुद्धा उपस्थिती लावली होती. केवळ सिनेसृष्टीतीलच नव्हे तर अनेक देशाविदेशातील राजकीय मंडळीसुद्धा या शाही विवाह सोहळ्यात उपस्थित होते. या विवाहसोहळ्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या लग्नात आलेल्या पाहुण्यांची अंबानींनी चांगलीच खातीरदारी केली. त्यांना येण्या-जाण्यासाठी खाजगी विमानं ते महागड्या भेटवस्तू या सर्व सोयीसुविधा त्यांनी उपलब्ध करुन दिल्या. अनंत आणि राधिका च्या लग्नात पाण्यासारखा पैसा खर्च केल्याचे दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर जिथे तिथे फक्त आणि फक्त अंबारीच्या लग्नाची झलकच पाहायला मिळते. अशातच आता या लग्न सोहळ्यातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अंबानींनी त्यांच्या खास २५ पाहुण्यांना दिलेले भेटवस्तू पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by CHAD ALEXANDER (@itschadalexander)

आणखी वाचा – अनंत-राधिकाच्या लग्नात अभिषेकऐवजी सलमानबरोबर दिसली ऐश्वर्या, ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण, नेमकं सत्य काय?

अनंत अंबानीने शाहरुख, सलमान आणि रणवीर सिंगसह २५ मित्रांना रिटर्न-गिफ्ट म्हणून तब्बल १८ कॅरेट सोन्याचे घड्याळ दिले आहे. ज्याची किंमत सुमारे २ कोटी रुपयांच्या आसपास आहे. रणवीर, शाहरुख त्यांना मिळालेल्या भेटवस्तू फ्लॉन्ट करताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.  अनंत आणि राधिकाचे लग्न १२ जुलै रोजी झाले होते. १३ जुलै रोजी दोघांचा शुभ आशीर्वाद सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांनी सहभाग घेतला होता.

आणखी वाचा – भुस्खलनामुळे बद्रीनाथमध्ये अडकली सुप्रसिद्ध अभिनेत्री, खाण्या-पिण्याचे होत आहेत हाल, म्हणाली, “भीषण परिस्थिती…”

दरम्यान, मुकेश अंबानी यांनी आपल्या धाकट्या लेकाच्या लग्नात कसलीच कमी भासू दिली नाही. अनेक दिग्गज व बड्या कलाकारांना लेकाच्या लग्नाचे आमंत्रण दिले असून अनेकांनी या लग्नसोहळ्याला खास हजेरी लावत चार चाँद लावले आहेत. राजकारण, मनोरंजन, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावली.

Tags: Anant Ambani Radhika Merchant Weddingentertainment newsWedding Gifts
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
WWE fame John Cena shared overwhelmed post for the Ambani family hospitality and also praised Shahrukh khan

अंबानींच्या पाहुणचाराने भारावला जॉन सिना, शाही थाटमाट पाहिल्यानंतर शेअर केली खास पोस्ट, शाहरुखचेही केलं कौतुक, म्हणाला...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.