वेळेनुसार काळ देखील बदलत जातो असं म्हणतात. सोशल मीडियावरील इंस्टाग्राम हे अँप जसे उदयास आले, तशी त्याची लोकप्रियता देखील वाढत गेली. फक्त साधारण लोकच नाही तर, मराठी आणि हिंदी कलाकार देखील इंस्टाग्रामचा पुरेपूर वापर करताना दिसतायत. (Priya Marathe Fire LooK)

अशातच फोटोशूट ही गोष्ट सुद्धा कलाकारांना अभिनयाइतकीच महत्वाची गोष्ट वाटू लागली आहे. अनेक कलाकार आपण कसे वेगळे फोटोशूट करू शकतो, याच्या प्रयत्नात असतात. अशीच मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठे हिने एका नवीन ठिकाणी फोटोशूट केलं आहे.

हे देखील वाचा: कलाकारांची मांदियाळी आणि सामाजिक विषय हाताळणारा चौकचा टिझर म्हणतोय ‘ वाघ आला वाघ’
प्रियाने पोस्ट केलेल्या फोटोजमध्ये प्रियाने रेड कलरचा ड्रेस परिधान केलाय. या लूकवर प्रियाने केस मोकळे ठेवले आहेत. आणि सोबत लेदर जॅकेट विथ गॉगल असा लुक केला आहे. हे फोटोशूट प्रियाने बांधकामाधीन इमारतीमध्ये केलंय. प्रियाच्या या फोटोजवर “आग लगा दी” “फायर” चाहत्यांनी अशा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. (Priya Marathe Fire LooK)

प्रिया मराठेने अभिनयाची सुरुवात कॉलेजात असल्यापासूनच केली, तिने अनेक एकांकिका आणि नाटकांमध्ये सहभाग घेऊन तिने तिच्या करियरला सुरुवात केली. “या सुखांनो या” या मराठी मालिकेपासून प्रियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर प्रियाला अनेक मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर प्रियाने मागे वळून पाहिलं नाही.

हे देखील वाचा: ‘लोकनाट्याला उशीर झाला तरी चालेल पण याची चांगलीच जिरवायची…’ म्हणून दादा कोंडके यांनी जिरवली होती ‘त्या’ हॉटेल वाल्याची खोड
तिने एकामागोमाग एक हिट , मालिकांमध्ये काम करताच राहिली. याचबरोबर प्रियाला हिंदी मालिका विश्वातून सुद्धा ऑफर येऊ लागल्या. तिची पहिली हिंदी मालिका होती “कसम से” या मालिकेनंतर प्रियाचा हिंदी मालिका विश्वामध्ये चांगलाच बोलबाला सुरु झाला. (Priya Marathe Fire LooK)

यानंतर प्रियाने “पवित्र रिश्ता” या मालिकेत हिंदी अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासोबत स्क्रिन शेअर केली. या मालिकेत प्रियाने खलनायिकेची भूमिका साकारली होती. या मालिकेतून प्रिया घरोघरी पोहोचली. प्रियाची नकारात्मक भूमिकाच प्रेक्षकांना इतकी आवडली की, प्रिया या मालिकेतून गेल्या नंतर सुद्धा प्रेक्षकांनी तिला मारत या मालिकेत आणा अशी दिग्दर्शकाकडे मागणी देखील केली.
