ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी आहे. दोघेही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असून वेगवेगळ्या मालिकांमध्ये काम करताना दिसत आहेत. अभिनयाबरोरबच दोघंही सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असतात. ते नेहमी त्यांचे योगासने करताना, फिरताना, मजा-मस्ती करताना तसेच हटके डान्स करतानाचे व्हिडीओ ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्यांचा एक वेगळा स्वॅग दिसून येत आहे. (Aishwarya narkar car driving)
ऐश्वर्या व अविनाश हे त्यांच्या हटके व वेगळ्या अंदाजामध्ये नेहमी दिसून येतात. ते नेहमी त्यांचे छंद जोपासताना दिसतात. मात्र त्यांच्या नवीन व्हिडीओमुळे खूप चर्चेत आले आहेत. तसेच या व्हिडीओला ‘थर थर… “THAR” असे कॅप्शन दिले आहे. यामध्ये ते एका अलिशान गाडीमध्ये दिसून येत आहेत. ही गाडी ऐश्वर्या स्वतः चालवताना दिसून येत आहेत. त्यांच्याबरोबर अविनाशदेखील दिसत आहेत. ही गाडी चालवल्यानंतर ऐश्वर्या यांनी आनंद व्यक्त केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळाली असून अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
ऐश्वर्या व अविनाश यांच्या या व्हिडीओवर काळकरांनी पसंती दर्शवली असून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता सिद्धार्थ बोडकेने प्रतिक्रिया देत इमोजी पोस्ट केल्या आहेत. तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “ओह्…थार ड्राइव्ह सो स्वीट”, सुकन्या मोने यांनी प्रतिक्रिया देत, “मन:पूर्व अभिनंदन” असे लिहिले आहे.
दोघांच्याही कामाबद्दल सांगायचे झाले तर ऐश्वर्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये काम करत आहेत. या मालिकेमध्ये त्या रुपाली ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. तसेच अविनाशदेखील ‘कन्यादान’ या मालिकेमध्ये दिसून आले होते.